पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसा निमित्त ‘सरकार आपल्या दारी’; टेंभुर्णीत सेवा संकल्प अभियान उत्साहात
बातमी सम्राट |अमोल मदने | माढा तालुका प्रतिनिधी | दि.२८/०९/२६/
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’ अंतर्गत माढा पश्चिम मंडलाच्या वतीने टेंभुर्णी येथे ‘सरकार आपल्या दारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.
सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष मा. गणेशजी चिवटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शासनाच्या विविध योजना केवळ कागदावर न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या अभियानात भाजपा माढा पश्चिम मंडलाचे मंडलाध्यक्ष योगेशजी बोबडे, टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. सुरजाताई बोबडे, माढा पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी परमेश्वर खरात, उपसरपंच प्रतिनिधी सतीश नेवसे, ग्रामपंचायत अधिकारी संजय साळुंखे, जयवंत पोळ, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम डोके, सचिन होदाडे, सुधीर दादा पाटील, सोमनाथ ताबे, गौतम कांबळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व टेंभुर्णी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








