मारोती एडकेवार, जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड, दि. २९ (बातमी सम्राट):- महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर केले असून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन,शेतकऱ्यांचा विचार करणे खूप गरजेचे आहे परंतु त्याच शेतात काम करणाऱ्या शेतमजूर आणि कामगार यांचाही विचार सरकार करेल का, हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना व प्रत्येक तालुक्याच्या लोकप्रतिनिधी यांना आपले सरकार पोर्टलद्वारे दैनिक बातमी सम्राट जिल्हा प्रतिनिधी नांदेड, पत्रकार मारोती एडकेवार यांनी करीत शेतमजूर व कामगारांना आर्थिक, मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
भूमिहीन शेतमजूर दुष्काळ पडल्यामुळे अत्यंत काळजीत पडलेला आहे. कारण शेतमजुरी करूनच त्याचं पोट व त्याच्या कुटुंबाची,उपभोग केल्या जाते परंतु महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात, कोरडा दुष्काळ पडला आहे अशात भूमिहीन मजूरदार काय करावे. यासाठी सरकारने उपयोजना करतील का हा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे.
शेतमजुरांचा आयुष्य हे शेतामध्ये काम करूनच त्याच्या कुटुंबाची जेवण्याची, राहण्याची,व त्याच्या मुलाच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी मेहनत करतो. परंतु आता शेतातच काही काम राहिलेला नाही त्यामुळे त्याच्या पोटावर जो उपासमारीची वेळ आली आहे. त्यावर शासनाने काय उपयोजना करतील याच प्रत्यक्ष त्याचे डोळे प्रत्येक हॉटेलमध्ये किराणा दुकानमध्ये चालणाऱ्या टीव्ही चॅनेल कडे पाहत आहे कारण त्याच्या घरात तर टीव्ही नाहीच पण न्यूज पेपर वर्तमानपत्र, टीव्ही चॅनेल च्या माध्यमातून सरकार आमच्यासाठी काहीतरी करेल याच अपेक्षेमध्ये शेतमजूर महाराष्ट्र सरकारकडे अपेक्षांनी बघत आहे. त्यामुळे संबंधित सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक आमदार व खासदारांना शेतमजुराची विनंती आहे की आपण आपल्या तालुक्यामध्ये शेतमजुरांसाठी मनरेगा सारखे कामे उपलब्ध करून देऊन व शेतमजूर, व अल्पभूधारक कामगार यांनी जगले पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर असेल मजूरदूर कामगारांसाठी मनरेगाची कामे सुरुवात करून आठवडी पेमेंट करावे जेणेकरून शेतमजूर व कामगार जगले पाहिजे यासाठी सरकारने असे घोषित करावे, अशी मागणी या वर्तमानपत्राच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील पत्रकार यांनी केले आहे.
शेतमजूर व कामगारांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे, शासनाने लक्ष द्यावे व शेतमजदूर व कामगारांना कोरडा दुष्काळ संबंधित उपयोजना करून सर्व शेतमजूर, व कामगारांना मनरेगा अंतर्गत कामे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आपले सरकार पोर्टलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे एडकेवार यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व पत्रकार हे अल्पभूधारक शेतकरी व शेतकरी व शेतमजूर व कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे,उभे असून माननीय मुख्यमंत्री व सर्व लोकप्रतिनिधींनी भूमिहीन कामगारांसाठी उपयोजना लवकरात लवकर अंमलबजावणी करावी व जाहीर करावे. मनरेगा अंतर्गत कामे करावी व आठ दिवसाचे पेमेंट करावे अशी विनंती करण्यात आली आहे.








