धनगरवाडी प्रतिनिधी : प्रकाश लांडे
धनगरवाडी : धनगरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत श्रीमती मिनाबाई राजेंद्र रकटे यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया ग्रामसेविका अधिकारी श्रीमती सरला कहार यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी लोकनियुक्त सरपंच गोपीनाथ भाऊसाहेब खरात, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव रामभाऊ आदमाने, गणेश शिवाजी राशिनकर, अशोक हरिभाऊ रकटे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपसरपंचपदी मिनाबाई राजेंद्र रकटे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले. गावाच्या विकासासाठी तसेच ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांच्या माध्यमातून सकारात्मक कामकाज होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी रंगनाथ जगन्नाथ राशिनकर, दत्तात्रय नामदेव रकटे, अनिल पुंजाजी रकटे, दादासाहेब हरिभाऊ मंडलिक, संभाजी जानुकु आदमाने, अंबादास गीताराम रकटे, अनिल रकटे, योगेश भानुदास रकटे, शिवाजी सखाराम राशिनकर, लक्ष्मण रावसाहेब राहिंज, गौरव अंबादास रकटे, रोहन अशोक रकटे, महेश राजेंद्र रकटे, अशोक सखाराम रकटे, बन्सी शंकर लांडे, प्रमोद बन्सी लांडे, सौरभ संजय रकटे, संदीप लांडे, दत्तू राशिनकर, चांगदेव सातव, साईनाथ भुसारी, ऋषिकेश राशिनकर, बाबासाहेब दातीर, कैलास राशिनकर, लक्ष्मण चांगदेव रकटे, अनिल परसराम रकटे, रामभाऊ चांगदेव रकटे, नाना परसराम रकटे तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे शिपाई विलास साळुंके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्रीमती मिनाबाई राजेंद्र रकटे यांचे ग्रामस्थ व मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.








