मुखेड तालुक्याचा ट्रिगर-१ मध्ये समावेश करुन सवलती लागू करा.
राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
मुखेड / प्रतिनिधी.
मुखेड तालुक्यात पावसाने मोठा खंड दिल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून उभी खरीप पिके वाळून जात आहेत.या पार्श्वभूमीवर मुखेड तालुक्याचा तात्काळ ट्रिगर-१ मध्ये दुष्काळ यादीत समावेश करून सर्व सवलती तातडीने लागू कराव्यात अशी मागणी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद या सामाजिक संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तहसीलदार मुखेड यांच्यामार्फत दि.२ आक्टोबंर रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुखेड तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे.नांदेड जिल्ह्यात मुखेड हा डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जातो.येथील हलक्या व डोंगराळ जमिनीची जलधारणा क्षमता कमी असल्याने पावसाच्या खंडाचा थेट फटका पिकांना बसला आहे.नदी,नाले,विहिरी, जलसाठे कोरडे पडत असून बोअरवेल व हातपंप आटण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा सुद्धा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.त्यामुळे मुखेड तालुका दुष्काळी यादीत ट्रिग्रर १ मध्ये समावेश करावा,पिकविमा मंजूर करावा,शेतमजुरांना अनुदान द्या,विद्यार्थ्यांची प्रवेश व शैक्षणिक फी माफ करावी, शेतकऱ्यांचे चालू कर्ज माफ करा,निराधार-अपंग-दिव्यांगाचे प्रश्न त्वरीत सोडवा, चारा-पाण्याची व्यवस्था करा तसेच बँकांना कर्ज वाटपाचे आदेश द्या अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आले आहेत. तहसीलदार यांना निवेदन देताना राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे मराठवाडा कार्याध्यक्ष सादक तांबोळी, मराठवाडा सरचिटणीस गौस अल्ली सलगरकर,नांदेड जिल्हाध्यक्ष महेताब शेख, जिल्हासचिव हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला,तालुकाध्यक्ष असद बल्खी,तालुका कार्याध्यक्ष जयभीम सोनकांबळे,उपाध्यक्ष अॅड. वाय.जे.तांबोळी,कायदेविषयक सल्लागार अॅड.शफी सय्यद,सल्लागार रज्जाक पठाण एकलारा,तालुका कोषाध्यक्ष अॅड.मिलिंद कांबळे,संघटक खाजाभाई शेख, शहराध्यक्ष गौस मिर्झा, माजीद मुजावर,उपाध्यक्ष चांदभाई येवतीकर,शहर उपाध्यक्ष इलियास कादरी, रज्जाक मनियार,नागेश सय्यद,मोईन कंधारी, यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








