परिस्थितीवर मात करत सावळी विहीर येथील आकाश जाधव याचे बी.ए. एलएल.बी.शिक्षणात यश..
आई-वडिलांची केली इच्छा पूर्ण.
शिर्डी.. राजेंद्र दुनबळे
अत्यंत गरिबीवर मात करत बी.ए. एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण करून
आई-वडिलांचे इच्छेस पात्र ठरणाऱ्या एडवोकेट आकाश गोरख जाधव याचे सर्वत्र मोठ्या उत्साहात अभिनंदन होत आहे
सावलिविहीर येथील रहिवासी सर्वसामान्य कुटुंबातील गोरख जाधव हे आकाशचे वडील रिक्षा चालवतात पत्नी. 2 मुले बहीण कु. किरण जाधव ही इलेक्ट्रॉनिक मीडियाची पत्रकार असून पत्रकार क्षेत्रात चांगले काम आहे दुसरा भाऊ साहिल हा देखील चांगल्या नोकरीला आहे.
सोमवार दि.5 ऑक्टोंबर रोजी दुपारी 11 वाजता
सावळी विहीर येथील सिद्धार्थ नगर
परिसरात पंच क्रोषीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थित सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
अत्यंत गरीब परिस्थिती आर्थिक परिस्थिती नसताना देखील, अनेक अडचणी आणि संघर्षाला सामोरे जात मोठ्या कष्टाने बी.ए. एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणादायी कामगिरी आकाश जाधव यांनी केली आहे.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही शिक्षणाची जिद्द त्यांनी सोडली नाही. शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या खर्चाची जुळवाजुळव करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, फुले शाहू आंबेडकर यांची प्रेरणा व विचारधाराने परिपक्व होऊन परिस्थितीसमोर हार न मानता मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.
गरिबी ही शिक्षणाच्या मार्गातील अडथळा ठरू नये, याचे प्रेरणादायी उदाहरण
आकाश गोरख जाधव
यांच्या यशातून समोर आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, शिक्षक तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाची जिद्द आणि मेहनत सोडली नाही, तर यश मिळवता येते,” असा संदेश त्यांच्या संघर्षातून मिळत आहे. त्याच्या या संघर्षमय जीवनाचा भावी तरुणांनी बोध घेण्याचे कार्य त्याने केले आहे…..








