जन आक्रोश महामोर्चाला आला वेग….
चक्रधर महाले भुसावळ प्रतिनिधी :-
आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात अनुसूचित जातीतील सर्व 59 जातीची एकता अबाधित ठेवण्यासाठी सामाजिक न्याय व भारतीय संविधानाच्या संरक्षणाच्या उद्देशाने भुसावळ येथील एससी, एसटी कार्यालय येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समिती जळगाव यांच्या वतीने नियोजन बैठक संपन्न झाली,बैठकीत रविवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी जळगाव येथील शिवतीर्थ मैदान कोर्ट चौक येथे होणाऱ्या जन आक्रोश महामोर्चाच्या पूर्वतयारीसह रावेर लोकसभा मतदारसंघातील जनसंपर्क संघटनात्मक बांधणी,गावनिहाय नियोजन आणि 59 जातीचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत मुकुंद सपकाळे राजू सूर्यवंशी विनोद सोनवणे शांताराम जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित वक्त्यांनी अनुसूचित जातीच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी सामाजिक ऐक्य दृढ करण्यासाठी आणि संविधानवादी विचार अधिक व्यापक करण्यासाठी सर्व समाज घटकांनी मोठ्या संख्येने जन आक्रोश महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले..








