तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जि. प. हायस्कूल पार्डी बोधडी खुर्दचा डंका..
“पात्र क्रिकेट संघाला युवानेते करण एंड्रलवार यांच्याकडून क्रीडा साहित्य भेट..!
किनवट प्रतिनिधी – मार्कंडेय सिरामवर
किनवट:
नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल पार्डी बोधडी खुर्दच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. क्रिकेट, बॅडमिंटन आणि कुस्ती या तीनही क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून या प्रशालेने तालुकास्तरावर आपल्या क्रीडा परंपरेचा झेंडा पुन्हा एकदा अभिमानाने फडकवला.
तालुकास्तरीय अंडर-१४ क्रिकेट स्पर्धेत पार्डी जिल्हा परिषद शाळेच्या क्रिकेट संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत थेट विजेतेपदावर नाव कोरले. दरम्यान विजेत्या क्रिकेट संघाकडे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक असलेले लेदर किट उपलब्ध नसल्याची बाब कळताच शिवसेनेचे युवानेते क्रीडाप्रेमी करण एंड्रलवार यांनी या क्रिकेट संघासाठी स्वयंस्फूर्तीने 2 किट उपलब्ध करून दिल्या असून नगराध्यक्ष सौ सुजाता विनोद एंड्रलवार यांच्या शुभहस्ते दिनांक 2 ऑक्टोबर रोजी किनवट येथील त्यांच्या निवासस्थानी विजेत्या क्रिकेट संघाला किट प्रदान करण्यात आल्या.आपला संघ निश्चितपणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी बजावून अहवाल स्थान प्राप्त करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
कर्णधार आदित्य जाटवे व उपकर्णधार कुणाल मस्से यांच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली समाधान केंद्रे, शिवनाथ रणखांब, अजय कटारे, जयराज केंद्रे, हरी दयाळ, रुद्र भदाळे दत्तात्रय नभुरे, शिवम नोळे आणि सुरज ऐतनवाड यांनी अष्टपैलू कामगिरी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला.
दरम्यान जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या क्रिकेट संघाकडे लेदरबॉलसाठी अत्यावश्यक किट उपलब्ध नसल्याने हा संघ जिल्हा स्तरावर कसा टिकेल, असा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब कळताच शिवसेनेचे युवानेते तथा क्रीडाप्रेमी करण एंड्रलवार यांनी स्वयंस्फूर्तीने विजेत्या संघाला दोन क्रिकेट किट उपलब्ध करून दिल्या असुन दिनांक 2 ऑक्टोबर रोजी त्यांच्या निवासस्थानी नगराध्यक्ष सौ सुजाता विनोद एंड्रलवार यांच्या शुभहस्ते विजेत्या संघाला कीट प्रदान करण्यात आल्या. या क्रीडा साहित्यामुळे पार्डी बोधडी चा संघ निश्चितपणे जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी करून अव्वल स्थान प्राप्त करेल आणि तालुक्याचा नावलौकिक वाढवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी युवा नेते रोहन एंड्रलवार, संतोष येलचलवार, डॉ . अमोल सूर्यवंशी,स्वीकृत नगरसेवक प्रशांत कोरडे आणि साई सिरमनवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पूर्वापार शैक्षणिक व क्रीडा परंपरेसाठी नावाजलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशामागे मुख्याध्यापक मोहन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा प्रमुख सुशील कापसे सर, विनोद पांचाळ सर व खोकले सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.किट वाटपप्रसंगी क्रीडा प्रमुख सुशील कापसे सर, राकेश गणोजवार सर,विनोद पांचाळ सर व मोहक पांचाळ सर हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाबद्दल शाळेतील शिक्षक मडावी सर, मुंडे सर,कोंकेवाड सर, नालमवार सर, कांदे सर ,डंगा सर, कांदे एन. व्ही.सर, गणोजवार सर,बालाजी कराड यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी देखील विजयी संघांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.








