बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावर महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा
कांताभाऊ राठोड | पुणे जिल्हा प्रतिनिधी
दि ०२ ऑक्टोंबर रोजी जालना दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची भेट घेऊन बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.
यावेळी बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्या, एसटी आरक्षणासाठी सुरू असलेला पाठपुरावा, शासनाच्या अभ्यास समितीची पुढील कार्यवाही तसेच समाजाच्या हक्काच्या प्रश्नांवर चर्चा करून शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी मांडली.
संत रामराव बापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बंजारा समाजाच्या हक्काच्या एसटी आरक्षणासाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने पाठपुरावा सुरूच राहील. अशी माहिती श्रीकांत राठोडयांनी दिली आहे.








