हिवरगाव पावसा येथे वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान
राहता शहर प्रतिनिधी.| हिना उबाळे
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा परिसरात झालेल्या जोरदार वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वादळाच्या तीव्रता असल्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली, झाडे ऊन मळून पडली, विद्युत खांबाचे नुकसान झाले, तसेच शेतकऱ्यांचे शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती भाजपचे तालुका उपाध्यक्ष केशव दवंगे यांनी आमदार अमोल खताळ यांच्या निदर्शनात आणून दिली.
वादळामुळे नुकसान झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे, अशा सूचना अमोल खताळ यांनी महसूल ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या त्यानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे तालुका उपाध्यक्ष केशव दवंगे यांनी सांगितले.
हिवरगाव पावसा गावचे सरपंच सुभाष दादा ग्रामपंचायत अधिकारी हरीश गडाख, आणि महसूल अधिकारी श्रीमती आवारी यांनी नुकसानग्रस्त ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन घरांचे पत्र्याचे झाडाचे तसेच इतर झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
संबंधित नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात आले आहे पंचनामे वेळेत झाल्याने शासनाच्या नियमानुसार मदत मिळण्याच्या प्रक्रिये लगती मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक बाधित शेतकऱ्याच्या शेतातील, नुकसानीचे तातडीने व प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे पूर्ण करावेत तसेच पात्र शेतकऱ्यांना शासनाचे नियमानुसार नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी.
अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.








