येवला तालुका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकारी यांची निवड…
चेअरमन पदी श्रीमती सविता साळुंके (सौंदाणे ) तर कार्यवाह पदि .नानासाहेब लहरे यांची बिनविरोध निवड
लक्ष्मण घुगे | राजापूर प्रतिनिधी
येवला येथे संचालक मंडळाची विषेश सभा बोलविण्यात आली. सदर सभेत चेअरमन पदाची श्रीमती सविता साळुंके तर कार्यवाहपदी नानासाहेब लहरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अर्चना शिंदे (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येवला) यांनी काम पाहीले निवडणुक कामात सचिव प्रशांत थोरात यांनी सहकार्य केले.
सदर निवडीसाठी .प्रमोददादा पाटील, .अर्जुनराव कोकाटे, प्रविणदादा पाटील अनिलदादा साळुंके , यांचे मार्गदर्शन लाभले. नवनिर्वाचित चेअरमन, कार्यवाह यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सदर निवडी प्रसंगी सन्माननीय व्हा.चेअरमन अरविंद जोरी, वाल्मीक नागरे, कानिफनाथ मढवई, तुकाराम लहरे, शिवाजी साताळकर, संजय डोंगरे, सुकदेव आहेर, विजय आरणे, प्रदीप पाटील, अनिल गावकर, राजेंद्र नागरे, महेश जगदाळे, शैला गवळी आदी उपस्थित होते.
संस्थेचे संचालक मंडळ
व सभासद बंधू भगिनी यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ करण्याचा प्रयत्न करेल असे नवनिर्वाचीत चेअरमन श्रीमती सविता साळुंके यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करून सर्वांचे मनापासून आभार मानले.
नवनिर्वाचीत चेअरमन सविता साळुंके यांना दिंडोंरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्करराव भगरे माजी खासदार समीर भुजबळ शिक्षक आमदार किशोर दराडे माजी नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सेक्रेटरी दिपक गायकवाड येवला तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अर्जुनराव घोडेराव यांनी कामकाजासाठी शुभेच्छा देवुन अभिनंदन केले .








