मुखेड प्रतिनिधी : मनोज बिरादार
*छावा मराठा युवा महासंघ, मुखेड* तालुक्याच्या वतीने आज तहसीलदार मुखेड यांना निवेदन देण्यात आले. संस्थापक अध्यक्ष धनाजीराव पाटील थेळकर, जिल्हा अध्यक्ष प्रदिप पाटील नंदनवनकर आणि तालुका अध्यक्ष *बजरंग पाटील पाळेकर* यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, *मुखेड तालुका जोपर्यंत कोरडा दुष्काळ जाहीर होत नाही तोपर्यंत नदी व तळ्यावरील विद्युत पंप जप्त करू नयेत व वीज पुरवठा खंडित करू नये.*
मुखेड तालुका तात्काळ *कोरडा दुष्काळ जाहीर करून ट्रिगर-१ मध्ये समाविष्ट* करावा व शेतकऱ्यांना *१००% पीकविमा* लागू करावा.
दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून मुखेड, देगलूर, नांदेड येथे शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची *अॅडमिशन फी, परीक्षा फी माफ* करावी व *एसटी बस पास मोफत* द्यावा.
तसेच *फेरफार नक्कलचे शासकीय शुल्क २० रुपये असताना १०० रुपये घेऊन शेतकऱ्यांची लूट* सुरू आहे, ती थांबवावी.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड, शालेय शिक्षण मंत्री व विद्युत महामंडळ मुखेड/नांदेड यांना देण्यात आल्या आहेत.








