राहता शहर प्रतिनिधी : हिना उबाळे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीस पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अहिल्यानगर जिल्हा व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी 7 ऑक्टोबर रोजी विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रेचे आयोजन शहरात केले आहे.
नऊ वाजता आनंद धाम समोरील केशर गुलाब मंगल कार्यालयाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी दिली.
नरेंद्र मोदी यांच्या गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान या कारकीर्दीला यंदा पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. याचा अभिमान अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व भाजपच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना आहे.
यानिमित्ताने बुधवारी विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रेचे आयोजन केले असून नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणाली द्वारे विकसित भारत संकल्प सभेत मार्गदर्शन करून पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
याच संकल्प सभेस विधानपरिषदेचे सभापती. राम शिंदे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाचे सदस्य उपाध्यक्ष डॉक्टर. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रम सिंह पाचपुते, आमदार अक्षय कर्डिले, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार विवेक कोल्हे, जिल्हा प्रभारी माजी आमदार राम सातपुते, लक्ष्मण सावजी भैरवी वाघ पलांडे, यांच्या सह जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी सांगितले








