जिल्हा प्रतिनिधी नांदेड: मारोती एडकेवार
नांदेड :दिनांक 6/10/2026 रोजी बिलोली तालुक्यातील जि. प. के. प्रा.शाळा केसराळी येथे नूतन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली.अध्यक्ष म्हणून श्री राजू राचन्ना पांचाळ तसेच उपाध्यक्ष म्हणून श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच शालेय समिती सदस्य पदी .श्री लक्ष्मण मलूगोंडा मुददलवार, गंगाधर बसवंत वडेटवार, रमाकांत मोहन वन्नलवार, संजय शिवाजी मोघे, रामा लिंगूराम टमटम, मौला पिंजारी, राहुल फकीरे, विजय कार्ले, भिमराव सोनकांबळे, भास्कर गायकवाड,खियामोदीन इनामदार यांची निवड करण्यात आली.
समिती निवड़ीसाठी केसराळी गावचे सरपंच श्री राजू पाटील मंधरणे, दत्तू पाटील माड़े, दिपक पाटील शिंदे, प्रशांत पाटील काळे, विनोद फकीरे, गणेश शिंदे माजी अध्यक्ष सातप्पा मुद्दलवार,गावातील महिला पालक,शाळेचे मुख्याध्यापक श्री सलीम शेख सर व सर्व शिक्षक उपस्थित होते. शालेय समितीचे अध्यक्ष राजू पांचाळ व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, यांना शिक्षणाची आवड व शिक्षण प्रेमी म्हणून त्यांनी गावात सातत्याने, विद्यार्थ्यावरती लक्ष केंद्रित करून गावांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे त्यांचे कार्य, पाहून सर्व गावकऱ्यांनी व पालकांनी यावेळी सर्व पालकांनी एकमताने, राजू पांचाळ व ज्ञानेश्वर गायकवाड यांची अध्यक्ष उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.








