दुष्काळाच्या पार्श्वभूमी वर नागरिकांची घरपट्टी, नळपट्टी माफ करा : वैभव चिरके यांची मागणी !
बातमी सम्राट | कुलदीप गायकवाड | बीड जिल्हा प्रतिनिधी | दि.०९/१०/२०२६ /
बीड शहर व परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शहराला पाणी पुरवठा देखील पंधरा ते वीस दिवसाला होत आहे. शहरातील बऱ्याच नागरिकांचे हातावर पोट आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे नगरपरिषदेने नागरिकांकडून घरपट्टी व नळपट्टी ची वसुली करणे हा नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार ठरत आहे.
त्यामुळे बीड नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून बीड नगरपरिषद हद्दीतील नागरिकांची घरपट्टी व नळपट्टी माफ करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात येत आहे.
दुष्काळाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगरपरिषदेने विशेष सभा घेऊन याबाबत अधिकृत ठराव मंजूर करावा, अन्यथा नागरिकांच्या या न्याय मागणीसाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा बाळासाहेब चिरके यांनी दिला आहे.








