जायदरे आडनदी बंधाराला नैसर्गिक स्वरूपात साईट असुन त्यावर बंधारा झाला तर बर्या गावांचा पाणी प्रश्न सुटेल -खासदार भगरे
लक्ष्मण घुगे राजापूर प्रतिनिधी
येवला तालुक्यातील जायदरे येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करजी भगरे सर यांनी मौजे जायदरे येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली तसेच वन विभागाच्या हद्दीत वन्य प्राण्यांसाठी असलेल्या वन तळ्यातील पाण्याची माहिती घेतली त्याप्रसंगी येवला येथील तहसीलदार आबा महाजन वनपरिक्षेत्र अधिकारी येवला राहुल घुगे वनपरि मंडळ अधिकारी तुषार देसाई ,वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी जायदरे परीसरात आजही वनात येतील छोट्या मोठ्या बंधाऱ्यामध्ये वन्य प्राण्यांना व पक्ष्यांना बऱ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याने समाधान होते. त्यांनी स्वतः वन विभागातील वन तळे व लहानसे बंधाऱ्यांमध्ये असलेला पाणीसाठा पाहून समाधान व्यक्त केले परंतु याच पाण्याच्या साठ्यावर जायदरे गावची तहान भागू शकते त्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे अशी बोलताना सांगितले.
जायदरे गावाला निसर्गाची खूप मोठी देणगी असून या दुष्काळ परिस्थिती सुद्धा या नदीला जागोजागी पाणी दिसले.
जायदरे आडनदी बंधाराला नैसर्गिक स्वरूपात साईट असुन त्यावर बंधारा झाला तर बर्या गावांचा पाणी प्रश्न सुटेल . त्यासाठी भुजबळ साहेबांना ही ह्या नैसर्गिक साईटची कल्पना देणे गरजेचे आहे.त्याच्या माध्यमातून दुष्काळी कामाच्या नियोजनातुन काम होऊ शकते.
ह्या दुष्काळ पहाणी दौरा तर येवला येथील शरदचंद्र पवार गटाचे युवा जिल्हाध्यक्ष शाहुराजे शिंदे, सुभाष निकम अध्यक्ष येवला लासलगाव विधानसभा शरदचंद्र पवार गट, गोरख पवार ,भाऊलाल काकड,व जायदरे येथील माजी सरपंच माजी चेअरमन वाल्मीक शेजवळ, माजी सरपंच दत्तु देवर ,रायभान शेजवळ भाऊलाल शेजवळ , मेंढपाळ अनिल जाधव,वनसेवक भाऊसाहेब वाघ दत्तू देवरे नवनाथ शेजवळ व इतर ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते.
वन विभागामार्फत घेण्यात आलेल्या जल व मृद संधारण तसेच माती नालाबांध या कामांमुळे आज दुष्काळजन्य परिस्थितीत देखील जंगलात चांगल्या प्रकारे पाणीसाठा आहे. त्याचा फायदा हा वन्य प्राण्यांना होत असल्याने त्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती कमी होण्यास मदत झाली आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत वन हद्दीत चांगल्या प्रकारे पाणी असल्याने मा. खासदार भगरे साहेब यांनी“वन विभागाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल समाधान व प्रशंसा व्यक्त केली.
राहुल घुगे वनपरिक्षेत्र अधिकारी येवला प्रादेशिक








