वन्यजीव सप्ताहानिमित्त पांजरवाडी शाळेत विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम
राजापूर प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
येवला तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम केवळ शेती आणि पशुधनावरच नव्हे तर पक्षी आणि वन्यजीवांवरही होत आहे नैसर्गिक पाणवठे आटल्याने वन्यजीव आणि पक्ष्यांना पाणी व अन्नाच्या शोधात भटकंती करावी लागत आहे अशा परिस्थितीत वन्यजीवांचे संवर्धन आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण अधिक महत्त्वाचे ठरते वन्यजीव हे केवळ जंगलातील प्राणी नसून संपूर्ण पर्यावरणीय व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत पक्षी प्राणी कीटक झाडे जलस्रोत आणि सूक्ष्मजीव यांच्यातील परस्परसंबंधामुळे निसर्गाचे चक्र सुरळीत चालते त्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण म्हणजे निसर्ग आणि मानवाच्या भवितव्याचे संरक्षण होय असा संदेश येवला तालुक्यातील पांजरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित वन्यजीव सप्ताहाच्या जनजागृतीपर कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला
वन्यजीव सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे माधव पिंगळे तसेच निसर्गमित्र व पर्यावरणप्रेमी विजय परदेशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वन्यजीव आणि जैवविविधतेचे महत्त्व विविध उदाहरणांसह समजावून सांगितले.
निसर्गामध्ये कोणताही घटक निरुपयोगी नसतो प्रत्येक सजीवाची परिसंस्थेत विशिष्ट भूमिका असते एखाद्या प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आले तर त्याचा परिणाम संपूर्ण अन्नसाखळीवर होऊ शकतो असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
वन्यजीवांमुळे जंगलातील नैसर्गिक समतोल राखला जातो अनेक पक्षी आणि प्राणी बीजप्रसार परागीभवन कीटक नियंत्रण आणि अन्नसाखळीचे संतुलन राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात त्यामुळे वाघ बिबट्या हरिण ससा साप घुबड चिमणी मधमाशी आणि फुलपाखरू अशा प्रत्येक जीवाचे निसर्गात स्वतंत्र महत्त्व असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
दुष्काळात वन्यजीवांसमोर पाणी आणि अन्नाचे संकट
येवला तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सध्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे विहिरी तलाव नाले आणि नैसर्गिक पाणवठ्यांमधील पाणीसाठा कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम वन्यजीव आणि पक्ष्यांवर होत आहे पाण्याच्या शोधात वन्यजीव मानवी वस्त्यांच्या जवळ येण्याची शक्यता वाढते त्यामुळे अशा काळात नागरिकांनी वन्यजीवांना त्रास न देता त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आणि शक्य त्या ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
झाडे वाचवा अधिवास वाचवा
वन्यजीवांचे संरक्षण केवळ शिकार थांबविण्यापुरते मर्यादित नसून त्यांचा नैसर्गिक अधिवास जंगल पाणवठे आणि अन्नसाखळी सुरक्षित ठेवणे तितकेच आवश्यक आहे वाढती वृक्षतोड जंगलतोड जलप्रदूषण प्लास्टिक कचरा नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास आणि मानवी हस्तक्षेप यामुळे अनेक वन्यजीवांच्या अस्तित्वास धोका निर्माण होत आहे त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा आणि वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित ठेवा हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
पक्ष्यांसाठी दाणे पाणी वन्यजीवांसाठी संवेदनशीलता
दुष्काळी परिस्थितीत पक्ष्यांसाठी घराच्या परिसरात पाण्याची भांडी ठेवणे दाण्याची व्यवस्था करणे परिसरात देशी झाडे लावणे प्लास्टिकचा वापर कमी करणे जंगलात कचरा न टाकणे आणि वन्यजीव दिसल्यास त्यांना त्रास न देणे अशा छोट्या कृतींतूनही संवर्धनाची मोठी चळवळ उभी राहू शकते असे यावेळी सांगण्यात आले.
वन्यजीव संरक्षण ही केवळ शासन किंवा वनविभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारी आहे विशेषतः विद्यार्थ्यांनी निसर्गाशी मैत्री करून आपल्या घरापासून आणि गावापासून संवर्धनाची सुरुवात करावी असे आवाहन करण्यात आले.
निसर्ग वाचला तरच मानवाचे भविष्य सुरक्षित राहील वन्यजीव वाचले तरच जैवविविधता टिकेल आणि जैवविविधता टिकली तरच पृथ्वीवरील जीवनाचे संतुलन कायम राहील असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव पक्षी झाडे जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन सोनवणे बाबासाहेब उशीर बाळू आहेर पूनम पाखले महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे माधव पिंगळे तसेच निसर्गमित्र विजय परदेशी उपस्थित होते
…………,………..
प्रतिक्रिया…..
पक्षी आणि वन्यजीव हे निसर्गाचे केवळ सौंदर्य नसून पर्यावरणाच्या आरोग्याचे महत्त्वाचे द्योतक आहेत सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक नैसर्गिक पाणवठे आटत असून पक्षी आणि वन्यजीवांसमोर पाणी आणि अन्नाचे संकट निर्माण होत आहे अशा काळात आपल्या परिसरातील पक्ष्यांसाठी पाणी आणि दाण्याची व्यवस्था करणे देशी वृक्षांचे संवर्धन करणे आणि वन्यजीवांना त्रास न देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे लहान वयातच विद्यार्थ्यांना निसर्ग आणि जैवविविधतेची ओळख करून दिली तर त्यांच्यामध्ये संवर्धनाची कायमस्वरूपी भावना निर्माण होईल आजची मुले निसर्गाची मित्र बनली तर उद्याचा पर्यावरणाचा समतोल निश्चितच अधिक सुरक्षित राहील
……
माधव पिंगळे महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना
…………………………………
प्रतिक्रिया
वन्यजीवांचे संवर्धन म्हणजे केवळ प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण नव्हे तर संपूर्ण निसर्गचक्राचे संरक्षण होय दुष्काळाच्या काळात पाणी आणि चाऱ्याची कमतरता मानवाबरोबरच पशुपक्षी आणि वन्यजीवांनाही जाणवते त्यामुळे पाणी झाडे आणि नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे आजच्या विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग वन्यजीव आणि जैवविविधतेबाबत संवेदनशीलता निर्माण झाली तर उद्याची पिढी पर्यावरणपूरक विचार करणारी घडेल निसर्ग आपल्यासाठी नाही तर आपण निसर्गाचा एक भाग आहोत ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजणे हीच वन्यजीव सप्ताहाची खरी फलश्रुती आहे
……विजय परदेशी निसर्गमित्र व पर्यावरणप्रेमी








