मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड – जिल्ह्यातील जनतेच्या जिवनातील जिवनआवशक अविभाज्य घटक म्हणजे पाणी आणि दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी चिंता व्यक्त करत पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध जलस्रोताचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे. वाॅटर फिल्टर ल्पांटमधुन पाणी फिल्टर प्रक्रिये दरम्यान जे वाया जाणारे पाणी आहे. त्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात यावा. आणि ते वाया जाणारे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी आणि गरजु नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी उपयोगात आणले जावे. किंवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक अशा उपाययोजना करण्यात याव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे . जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ८ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचे उत्पादन व विक्री करणाऱ्या वाॅटर असोसिएशन च्या सदस्यांची बैठक घेऊन या बैठकीत पाण्याचा अपव्यय टाळून आणि त्यांच्या पुनर्वापरावर उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. एक लिटर पॅकेज्ड पाण्याचे उत्पादन करणाऱ्या युनिटची संख्या मर्यादित असुन. त्यामध्ये वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी आहे.मात्र २० लिटरच्या फिल्टर पाण्याच्या जारची विक्री करणारे सुमारे ३५० ते ४०० युनिट जिल्ह्यात कार्यरत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली आहे. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वाटर फिल्टर ल्पांटमधुन प्रक्रियेदरम्यान वाया जाणारे पाणी टंचाईच्या काळात दैनंदिन वापरासाठी उपयोगात उपलब्ध करून द्यावे. वाया जाणारे पाणी मोठ्या टाकीत साठवून ठेवण्याची व्यवस्था करुन गुणवत्तेनुसार हे पाणी परिसरातील गरजु नागरिकांना कपडे धुणे, भांडी घासणे, स्वच्छता आदी कामांसाठी उपलब्ध करून द्यावे. यामुळे पाणी टंचाईच्या काळात नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळु शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व परवानाधारक विनापरवाना धारक वाटर फिल्टर ल्पांट चालक तसेच विक्रेते यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पाणी बचतीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे.








