शिर्डी..राजेंद्र दूनबळे
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील सावळीविहीर फार्म कृषी संशोधन केंद्रात नेहमी नवनवीन उपक्रम केले जातात कृषी संशोधन केंद्र सावळी विहीर फार्म यांची स्थापना 1915 साली झाली या केंद्रात स्थापनेपासून ते आतापर्यंत संशोधन आणि बिजोत्पादन असे भरीव योगदान दिले आहे तसेच स्वतंत्र पुर्व काळामध्ये मुगाचा कोपरगाव 1, भुईमूग कोपरगाव1, कोपरगाव 3 , कापसाचा कोपरगाव 203 हे वाण विकसित केले आहे महात्मा कृषी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर विद्यापीठाने विकसित केलेल्या ज्वारी, उडीद,मुग, सोयाबीन,तुर, विविध पिकांच्या चाचण्या दिल्या आहेत 2004 पासून संकरित सुर्यफुलावर संशोधन चालू होते या संशोधन केंद्रांची 75 एकर जमीन नागपुरच्या पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला हस्तांतरित झाल्यापासून फार्म महसुल नीधीची कमतरता , कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, जमिनीची कमतरता, तरीसुद्धा संशोधन केंद्राने अडचणींवर मात करून सुर्यफुलाचा फुले अर्णव हा नवीन वाण विकसित करण्यात आला आहे अशी माहिती संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ पी,एस, बेल्हेकर यांनी सांगितली *फुले अर्णव*या संकरीत वाणाला नुकताच कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे झालेल्या 54 व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे सदरचा वाण हा सर्वाधिक उत्पादन व 39 टक्के तेलाचे प्रमाण असलेला वाण आहे विविध किड व रोगप्रतिकारक्षम या वाणाचे दाणे मोठे गडद काळ्या रंगाचे असून फुलांच्या मध्यभागी दाणे भरतात वाण 94 दिवसांनी पक्व होणार असून फुलांचा व्यास देखील मोठा आहे सर्वाधिक उत्पादन व तेलाचे प्रमाण अधिक असल्याने शेतकरी बांधवांसह सर्वांच्या पसंतीस उतरला आहे








