*नागपूर, दि. ९ ऑक्टोबर २०२६*
आज महाराष्ट्राची उपराजधानी आणि विश्ववंद्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्मदीक्षेचे केंद्र असलेल्या नागपूर नगरीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभागाची अत्यंत महत्त्वपूर्ण *LDM (लीडर डेव्हलपमेंट मिशन)* बैठक संपन्न झाली.
ही बैठक *मध्य प्रदेश राज्याचे मा. कॅबिनेट मंत्री तथा महाराष्ट्र LDM प्रमुख मा. आ. सुरेंद्रजी चौधरी साहेब* यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माननीय *खासदार श्री. शामकुमार बर्वे साहेब* यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.
ही संपूर्ण बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे कर्तव्यदक्ष, कार्यक्षम अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचे ख्यातनाम गायक, विचारवंत *मा. डॉ. अनिरुद्धजी वनकर साहेब* यांच्या नेतृत्वाखाली व कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली.
ही LDM बैठक ही *लोकनेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. खासदार राहुलजी गांधी यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून* साकार झालेली आहे. काँग्रेस पक्षाला तळागाळापर्यंत, दलित-वंचित समाजाच्या प्रत्येक वस्तीपर्यंत घेऊन जाणे आणि नवे नेतृत्व घडवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
आजच्या बैठकीत महाराष्ट्रातील अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या *५ लोकसभा मतदारसंघ – 1)शिर्डी, 2)रामटेक, 3)अमरावती, 4)लातूर आणि 5)सोलापूर* चा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष *मा. राजेशजी लाडे साहेब* यांच्यासह उपस्थित सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या मतदारसंघातील संघटनात्मक स्थिती, बूथ रचना आणि आगामी रणनीतीचा सविस्तर अहवाल सादर केला.
*अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष मा. बंटी यादव* यांनी शिर्डी (SC) लोकसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा, मतदारांची आकडेवारी आणि पक्षाच्या बळकटीसाठीचा आराखडा मांडला.
तसेच लातूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा लातूर शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रवीण कांबळे सर यांनी मांडला
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा ऍड.मयूरजी खरात
तसेच रामटेक लोकसभेचा आढावा जिल्हाध्यक्ष निखिल जी पाटील यांनी सादर केला
तर अमरावती मतदारसंघाचा आढावा जिल्हाध्यक्ष यांनी मांडला
यावेळी LDM चे समन्वयक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते *मा. शशिकांत थोरात साहेब, मा. रामनाथ गायकवाड साहेब आणि मा. विनोदजी गायकवाड सर* यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी नागपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अश्विनजी बैस, नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष माननीय सौ अवंतिका लेकुरवाळे, प्रदेश काँग्रेसच्या महासचिव माननीय कुंदाताई राऊत, प्रदेश काँग्रेसचे महासचिव रविंद्रजी दरेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल जी घरडे, प्रदेश काँग्रेसचे स्वप्निल जी पातोडे आधी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्यायाचा विचार हाच काँग्रेस पक्षाचा आत्मा असून, राहुलजी गांधी व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र पाल गौतमजी यांच्या नेतृत्वाखाली LDM च्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक आरक्षित मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा अधिक मजबुतीने फडकवण्याचा एकमुखी निर्धार यावेळी करण्यात आला.
*जय भीम! जय संविधान! जय काँग्रेस!*








