निमगाव खैरी येथे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या उपस्थितीत सोयाबीन पीक कापणी प्रयोग…
बातमी सम्राट| टाकळीभान प्रतिनिधी | संदीप जाधव /| दि.११/१०/२०२६/
श्रीरामपूर तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील सर्व 56 गावांमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकांच्या प्रत्यक्ष उत्पादनाची वस्तुनिष्ठ नोंद करण्यासाठी निमगाव खैरी येथे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोयाबीन पीक कापणी प्रयोग पार पडला.
प्रतिकूल हवामानात शेतकऱ्यांना पीक विम्याचा योग्य लाभ मिळावा यासाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन डिजिटल पद्धतीने
अचूक व पारदर्शक मोजणी करण्यात आली. या वेळी तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे यांनी उपस्थितांना पीक कापणी प्रयोगाची कार्यपद्धती आणि त्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. या प्रयोगादरम्यान उप कृषी अधिकारी सुधाकर कदम, मंडळ कृषी अधिकारी पौर्णिमा गाडे, मनीष पंढरे, सहाय्यक कृषी अधिकारी नवनाथ डोकडे, विकास पटारे, विमा कंपनीचे
प्रतिनिधी यशवंत पवळे, सरपंच दत्तात्रय झुरळे, तलाठी बाळासाहेब कर्जुले, ग्रामसेवक सुधीर उंडे यांच्यासह स्थानिक प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन, कृषी विभाग व विमा कंपनीच्या समन्वयातून हा प्रयोग यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक कृषी अधिकारी नवनाथ डोकडे यांनी आभार मानले.








