अशोकलाच ऊस देऊन आपली कामधेनू वाचवा ! माजी आमदार मुरकुटे यांचे आवाहन…
बातमी सम्राट। टाकळीभान प्रतिनिधी | संदीप जाधव | दि.११/१०/२०२६/
कारखानदारी अडचणीत आहे मात्र अशोकच्या कार्यक्षेत्रात बाहेरचे दलाल येऊन वातावरण कलुषीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. गेली ४० वर्षे या भागात ऊसाचे क्षेत्र वाढवण्याचे काम केले त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र वाढले. अशोक कारखाना परीसराची कामधेनु आहे. त्यामुळे कामधेनु वाचवण्यासाठी अशोकलाच ऊस द्यावा असे अवाहन अशोक कारखान्याचे सर्वेसर्वा माजीआमदार भानुदास मुरकुटे
टाकळीभान येथील सेवा संस्थेच्या प्रांगणात ऊस उत्पादकांच्या आयोजित बैठकित बोलताना केले. अध्यक्षस्थानी जेष्ठ प्रगतशील शेतकरी बाबासाहेब बनकर होते.
यावेळी लहानभाऊ नाईक, माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, भारत भवार, शिवाजी शिंदे, राजेंद्र कोकणे, मयुर पटारे, दत्तात्रय नाईक, नानासाहेब लेलकर,
संचालक निरज मुरकुटे, मधुकर कोकणे, बापुराव त्रिभुवन, दादासाहेब कोकणे, विलास दाभाडे, प्रा. जयकर मगर, गजानन कोकणे, लहानभाऊ पवार, रावसाहेब वाघुले प्रमुख उपस्थित होते.
ऊस गळीत हंगाम सुरु झाला आसल्याने व अशोक बाबत वेगवेगळ्या वावड्या उठत आसल्याने अशोकचे सर्वेसर्वा माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी कार्यक्षेत्रात सभासदांच्या बैठका घेऊनअशोकची चालु भूमिका आक्रमकपणे मांडत आहेत. यावेळी सभासदांशी संवाद साधताना मुरकुटे म्हणाले कि, गेली ४० पये अशोकच्या
कार्यक्षेतात पाण्यासाठी सतत संघर्ष केला आहे. १९८७ साली कार्यक्षेत्रात केवळ ३५ हजार टन ऊस गाळपासाठी होता, आमदार आसताना के.टी. बंधारे कार्यक्षेत्रात अशोक बंधारे तयार करुन पाणी आडवले व जिरवले. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले व ७ ते ८ लाख टन ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध झाला आहे. आज ज्यांचे अशोकच्या कार्यक्षेत्रात उस वाढीसाठी कोणतेही योगदान नाही असे दलाल येऊन सभासदा मध्ये संभ्रम निर्माण करुन वातावरण कलुषीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेली ४० वर्षे अशोकने ऊसाचा
रुपया ठेला नाही. जिल्हातील चांगल्या कारखान्यांच्या बरोबरीने भाव दिलेला आहे. शिक्षण संस्था स्वतःच्या मालकीच्या न करता अशोकच्या मालकीच्या केल्या. सभासदांच्या मुलांना त्यातुन दर्जेदार शिक्षण दिले जात करता जात आहे. राज्यात साखर उद्योग अडचणीत आहे. त्याचा अशोकच्या कार्यक्षेत्रात बाहेरचे दलाल येवुन अपप्रचार करीत आहेत व सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करून ऊसाची पळवापळपी करायला टपलेले आहेत. अशोक बंद पाडण्याचा या दलालांचा डाव आहे. मात्र अशोक ही तालुक्याची कामधेनु आहे. त्यावर तालुक्याची बाजारपेठ अवलंबुन आहे. त्यामुळे ऊस सभासदांमध्ये संभ्रम उत्पादक सभासदांनी अशोकलाच ऊस पुरवठा करून कामधेनु वाचवली पाहीजे. त्यामुळे अशोक सुरु राहीला पाहीजे. भेंडा व सोनईच्या बरोबरीने अशोकने
नेहमीच दर दिलेला आहे. कामधेनु वाचवण्यासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी व सभासदांनी अशोकलाच ऊस द्यावा असे आवाहनही शेवटी मुरकुटे यांनी केले.
यावेळी कारेगाव भागचे संचालक शिवाजी शिंदे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, भारत भवार, प्राचार्य जयकर मगर यांनी मनोगत व्यक्त करुन काही सुचना मांडाल्या व अशोकलाच ऊस द्यावा असे आवाहन केले. यावेळी
सुनिल बोडखे, रामकृष्ण गायकवाड, बापुसाहेब शिंदे, रंगनाथ पवार, रामनाथ पठारे, तुकाराम बोडखे, मच्छींद्र कोकणे, पाराजी पटारे, रेवननाथ कोकणे, बाळासाहेब खुरुद, प्रकाश नाईक, सुभाष पटारे, सुभाष येवले, शिवाजी पटारे, गोवर्धन पटाने, अनिल कोको, प्रकाश पटारे, गंगाधर चोडणे, संतोष पटारे, पटारे आदींसह सभासद व ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट- राजकिय विरोधक असलो तरी ऊस अशोकलाच : कोकणे
गेल्या काही वर्षापासुन श्रीरामपूरची ओळखा संस्था बंद पाडणारा तालुका म्हणून झाली आहे. तालुक्यातील मुळा प्रवरा विज संस्था,पिप्लस बँक, अनेक पतसंस्था, सुतगिरणी, खरेदी विक्रि संघ अश्या अनेक सेवा संख्या बंद पडलेल्या आहेत. बाजारपेठ जिवंत ठेवणारी अशोक कारखाना ही एकमेव संस्था आज जिवंत आहे. त्यामुळे ही कामधेनु जगली पाहीजे, राजकारणात मुरकुटे यांचा राजकिय विरोधक आसलो तरी आजपर्यंत ऊस अशोकलाच देत आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनीही कामधेनु वाचवण्यासाठी अशोकाच उस द्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे उत्तर अहिल्यानगर अध्यक्ष राजेंद्र पाटील कोकणे यांनी केले.








