राजापूर येथे दुष्काळी पंचनामे सुरू…
लक्ष्मण घुगे | राजापूर प्रतिनिधी | नाशिक | दि.११/१०/२०२६/
राजापूर हे दुष्काळी पंचनामे सुरू येवला तालुक्यातील राजापूर येथे सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे महसूल विभागामार्फत पंचनामे सुरू असून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात पंचनामे सुरू असून मका सोयाबीन पिकाचे पूर्णतः नुकसान झाले असल्याने प्रत्यक्षात पंचनामा करताना महसूल विभागाचे कामगार तलाठी सविता धीवर ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत बोरसे कोतवाल अरुण जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी रहीम सय्यद, नितीन डिके,योगेश वाघ, आदी कर्मचारी पंचनामा करत असून प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष फोटो काढून पंचनामा सुरू असून सर्व शेतकऱ्यांना शासनाचया मदतीपासुन वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहेत येवला तालुक्यातील पूर्व भाग म्हटला की यावर्षीची दुष्काळी परिस्थिती भयानक परिस्थिती असून खरिपाचे संपूर्ण पीक वाया गेलेले आहेत त्यात मुख्य पीक म्हणजे मका सोयाबीन तूर हे पिके वाया गेलेले आहेत शासनाने पंचनामे झाल्यानंतर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गांनी केली आहे.








