स्वतःच्या कृतीतून स्वच्छता संदेश देणारा ‘ राजापूरचा’ अवलिया शिक्षक; समाजकार्याचा अनोखा आदर्श!
लक्ष्मण घुगे | राजापूर प्रतिनिधी | नाशिक | दि.११/१०/२०२६/
येवला तालुक्यातील राजापूर येथील नाईक वस्ती शाळेचे जिल्हा परिषद शिक्षक स्वच्छता मोहीम स्वतः राबवत असून त्यांनी आतापर्यंत अंतही अंकाई येथे जाऊन प्लास्टिक गोळा करून त्याची विल्हेगाट लावत आहेत त्यांनी एक समाजात एक आदर्श निर्माण केला आहे आपण व आपली व इतरांनी पण असेच कार्य करावे असे आवाहन प्रकाश हरणे सर यांनी केले आहे
येवला येथे वास्तव्यस असून स्वच्छता ही काळाची गरज आहेत
“स्वच्छता ही केवळ भाषणापुरती मर्यादित न ठेवता, ती प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जगण्यात आणली पाहिजे,” हाच संदेश आपल्या कृतीतून देणारे प्रकाश हरणे जिल्हा परिषद शाळा नाईकवस्ती राजापूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत सध्या संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरले आहेत. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, गेल्या शनिवार व रविवारी त्यांनी अंकाई किल्ला, क्रीडा संकुल येवला येथे अविरतपणे परिसर स्वच्छतेचे व्रत चालवत आहेत.
त्यांच्या या उपक्रमामुळे आज परिसराचा कायापालट झाला आहे ‘प्लास्टिक मुक्ती’चा ध्यास
केवळ परिसर झाडणे एवढ्यावरच ते थांबत नाहीत, तर रस्त्यावर पडलेले प्लास्टिक गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावतात.प्रकाश हरणे यांच्या या कृतीतून प्रेरणा घेऊन तरुण मंडळीही आता दर आठवडा स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे अशी अपेक्षा करतात. “भाषणांपेक्षा कृती माणसाला जास्त बदलते,” .प्रकाश हरणे अभिमानाने सांगतात.








