शेतकऱ्यांसाठी जलसमाधी आंदोलन करणारच..!
21 ऑक्टोबरला वारकरी धर्म परिषदेची वार्षिक आढावा सभा.
राष्ट्रीय तथा राज्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.
उज्वल जैस्वाल | बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी | दिनांक /१८/१०/२०२६/
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नैसर्गिक आपत्तीची मदत सरकारने जाहीर करावी. पाच हजार रुपयांचे तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसणारी आहे. करिता वारकरी धर्म परिषद आणि आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने नियोजित जलसमाधी आंदोलनावर आम्ही ठाम आहे. यासह विविध विषय आणि मागण्यांसाठी वारकरी धर्म परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आणि राज्य पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक सभेचे आयोजन 21 ऑक्टोबरला बुलढाण्यात करण्यात आले आहे.
वारकरी आणि शेतकरी एकच धर्म आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रथमच वारकरी धर्म परिषदेने आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. त्या अनुषंगाने वारकरी धर्म परिषदेची वार्षिक आढावा बैठक दसऱ्याच्या पर्वावर 21 ऑक्टोबरला सकाळी 11.30 वामहात्मा फुले शॉपिंग कॉम्प्लेक्स, बुलढाणा येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
सदर वार्षिक सभेला वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वारकरी धर्मभूषण वासुदेव महाराज शास्त्री,राष्ट्रीय महासचिव हभप प्रबोधनकार ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील, विदर्भ प्रदेशाध्यक्ष विलास महाराज वाघमारे, यांच्यासह राष्ट्रीय तथा राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने सदर बैठकीला उपस्थित राहणार आहे.
वार्षिक आढावा सभेत पुढील नियोजित वर्षभराचे उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन, पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा, नवनियुक्ती, तसेच वारकरी धर्म परिषदेने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळावी या अनुषंगाने जलसमाधी आंदोलनाची आंदोलनात्मक भूमिका, वारकरी दसरा मेळावा आदी महत्त्वपूर्ण विषयाच्या अनुषंगाने सदर वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी तथा वारकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी महत्वपूर्ण असलेल्या वार्षिक सभेला राष्ट्रीय,राज्य तथा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे.
असे आवाहन आढावा सभेचे निमंत्रक तथा विदर्भ प्रदेशाध्यक्ष विलास महाराज वाघमारे, जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज घोंगटे,जिल्हा सचिव नंदकिशोर निमकर्डे, गंगाताई वक्टे,जिल्हा उपाध्यक्ष नंदाताई घोंगटे, प्रसिद्धीप्रमुख विनोद चिपडे,तालुकाध्यक्ष मंदाताई सोनटक्के, सचिव गजानन महाराज थिगळे, संतोष घोंगटे, सुबोध गावंडे, अश्विन आळशी यांच्यासह जिल्हा तथा तालुका पदाधिकाऱ्यांनी केले आहे.








