दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासकामांचा वेग आणि सर्वसामान्य जनतेप्रती असलेली ठाम बांधिलकी यामुळे प्रेरित होऊन दौंड विधानसभा मतदार संघातील शेकडो युवा सैनिक व शेतकऱ्यांनी शिवसेना पक्षात उत्स्फूर्तपणे प्रवेश केला.
शिवसेना जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि ०६/०८/२०२६ रोजी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी टाकळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाळासाहेब गरदरे, कुरकुंभ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बाबासाहेब गायकवाड, खुटबाव ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच सिंधुताई थोरात, जिरेगाव ग्रामपंचायत सदस्य बापूराव सूर्यवंशी तसेच नानासाहेब विठ्ठल थोरात, आकाश जगताप, हेमंत गाढवे, सुरज पवार, प्रवीण पवार, आदेश गाढवे, यश नाझिरकर, नितीन गाढवे, सूर्यकांत सूर्यवंशी, किरण भंडलकर, कैलास गरगडे, वसीम शेख, मोहन भोसले, अक्षय दिवेकर यांसह अनेक युवकांनी मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश केला. ग्रामपंचायत स्तरावरील विद्यमान व माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचाही या प्रवेशात सक्रिय सहभाग असून, स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून आले.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा. विजयसिंह दादा चव्हाण, तालुकाप्रमुख रोहित दादा जाधव, विधानसभा प्रमुख मा. हनुमंतजी निगडे, तालुका समन्वयक नवनाथ जगताप, तालुका संघटक किसनराव हंडाळ,शिवसेना कार्यालयीन प्रमुख प्रशांत खराडे,सोशल मीडिया तालुकाप्रमुख मा. राहुलजी फडके, उपतालुकाप्रमुख दिलीप भागवत, केडगाव शहर प्रमुख आशिष गायकवाड तसेच शंकर ठोंबरे, दत्तात्रय चव्हाण, उन्मेश शितोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्य प्रवेशामुळे दौंड विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढली असून, आगामी काळात पक्ष अधिक प्रभावीपणे कार्य करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.








