लक्ष्मण घुगे राजापूर प्रतिनिधी येवला तालुक्यातील नगरसुल
::येथील पोलीस स्टेशन परिसरात सुमारे १२५ झाडांचे लागवड येवला तालुक्याला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी नगरसुल पोलीस स्टेशनचे ए एस टी दौलत ठोंबरे तालुका पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे पोलिस नंदकिशोर पिंपळे व नगरसुल ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजेंद्र पैठणकर , भाजपाचे विभाग प्रमुख जनार्दन गंडाळ,शैलेश शिंदे, शशी शेलार ,डॉक्टर वाल्मीक बोरसे, दत्तु पैठणकर, विलास निकम व कमांडो डिफेन्स करिअर अकॅडमी चे संचालक अनिल वरे व अकॅडमी चे विद्यार्थी त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ यांच्या हस्ते सुमारे १२५ वृक्षांची रोपे लावण्यात आली त्यामध्ये चिंच ,पिंपळ, सिताफळ, पेरू, जांभूळ, व इतर जंगली झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली
//नगरसुल पोलीस दुरक्षेत्राची मरगळ झटकून या यामध्ये काम करणार्या पोलीसांना पुर्णवेळ या स्टेशनवर कामाची जबाबदारी देवून भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळण्या साठी काम करतील
या पोलीस स्टेशनच्या परिसरात आज लावलेल्या लहान वृक्ष रोपांच्या संरक्षणासाठी तात्काळ संरक्षण जाळीचे पोलीस स्टेशनला कंपाउंड होणे गरजेचे .
संदीपकुमार बोरसे पी आय येवला तालुका पोलीस स्टेशन//
//नगरसुल पोलीस स्टेशनचे कार्यालयाचे बांधकाम
व कार्यालयाला संरक्षण जाळीचे कंपाउंड साठी एक वर्षापासून फक्त अँगल लावून उभे आहे परंतु अद्याप जाळी नाही. तरीही दोन्ही अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावा
राजेंद्र पैठणकर माजी चेअरमन नगरसुल//








