जळगाव जिल्हा आदिवासी सेलचे काँग्रेस अध्यक्ष संजू दादा जमादार लोहारा यांचे निधन
जिल्हा प्रतिनिधी : बशीर तडवी
जळगाव जिल्हा आदिवासी सेलचे काँग्रेसचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले संजू दादा जमादार लोहारा यांचे शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह सामाजिक, राजकीय आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
संजू दादा जमादार हे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून सातत्याने कार्य करणारे निष्ठावान कार्यकर्ते व जिल्हास्तरीय नेतृत्व होते. जळगाव जिल्ह्यातील विविध समाजघटकांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव प्रयत्न केले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याच्या वृत्तीमुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार व जनसंपर्क होता.
त्यांच्या अकाली निधनाने काँग्रेस पक्षाने एक निष्ठावान कार्यकर्ता, समाजाने एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व आणि असंख्य नागरिकांनी आपला जिव्हाळ्याचा सहकारी गमावला आहे.
संजू दादा जमादार लोहारा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तेष्टांना व असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
ॐ शांती! भावपूर्ण श्रद्धांजली!








