गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप
पाचोरा प्रतिनिधी गौतम सोनवणे
रांजणगाव : माध्यमिक विद्यालय रांजणगाव येथे साहित्यरत्न् लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याच्या जयंती निमित्त आणि 15 ऑगस्ट रोजी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील 40 विद्यार्थ्यांना गणवेशांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्यध्यपिका लतिका हिवरे मॅडम हे उपस्थित होते. तसेच स्व मायाताई 2627 फॉउंडेशन चाळीसगाव चे प्रमुख भूषण भाऊ नवगिरे, संजय भाऊ कापसे, सुभाष साहेब पगारे,विक्की हडपे व शिक्षकवृंद, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दर्जेदार व वेळेत गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी शाळेचे निलेश पवार सर व ठाकूर सर यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन केले. गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना निर्माण होऊन शालेय वातावरण अधिक सकारात्मक होण्यास मदत होते, असे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन व संचालन शाळेतील शिक्षक अमृतकार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.








