हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रभक्तीचा जागर
राहता शहर प्रतिनिधी I हिना उबाळे
राहता नगरपरिषद, व नगराधक्ष तसेच सर्व,नगरसेवक व ग्रामस्थ,यांच्या वतीने आयोजित (हर घर तिरंगा) अभियानाच्या भव्य तिरंगा रॅलिचा शुभारंभ भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः रॅलीत सहभागी होत.
शालेय विद्यार्थ्यांसोबत तिरंगा हातात घेऊन राष्ट्र भक्तीचा उत्साह अनुभवला.भारतमातेच्या जयघोषात निघालेल्या या रॅलीत विद्यार्थी सह राहता शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला राष्ट्रध्वजाचा, सन्मान, देशभक्तीची भावना,आणि नव्या पिढीमध्ये राष्ट्र प्रेमाची जाणीव अधिक दृढ करण्याचा संदेश देणारी ही तिरंगा रॅली राहता शहरासाठी अभिमानाचा शन ठरली.
यावेळी नगराधक्ष, सर्व नगरसेवक, शहरातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








