शिर्डीत कर्करोग रुग्णांसह 40 वर्षावरील नागरिकांसाठी हाडांची घनता तपासणी शिबिर
शिबिराला मिळाला उत्कृष्ट प्रतिसाद 250 अधिक रुग्णांनी घेतला तपासणीचा लाभ
राहता शहर प्रतिनिधी I हिना उबाळे
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने श्री साईनाथ रुग्णालय येथे कर्करोग रुग्णांस चाळीस वर्षावरील नागरिकांसाठी विशेष हाडांची घनता (Bone Mineral Density/BMD) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचा 250 हून अधिक रुग्णांनी लाभ घेत हाडांची घनता तपासणी करून घेतली.
शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फित कापून तसेच श्री साईबाबांची आरती करून करण्यात आले वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला.
कर्करोगाच्या उपचार दरम्यान तसेच वाढत्या वयामुळे हाडांचे घनता कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे हाडांचे आरोग्य तपासणी आणि भविष्यातील हाडांशी संबंधित आजारांचा धोका वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने कर्करोग रुग्णासोबत चाळीस वर्षावरील इतर नागरिकांसाठी या विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. मुकुल घरोटे, डॉ. रवी अंतरे. डॉ. कडू मॅडम सहाय्यक सेविका नजमा सय्यद, काकासाहेब ठोंबरे यांच्यासह श्री साईनाथ रुग्णालयातील डॉक्टर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने रुग्ण उपस्थित होते.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या माध्यमातून तरुणांना आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध आरोग्य विषयक उपक्रम सातत्याने राबविले जात आहे.
या शिबिराला ही रुग्णांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.








