यवतच्या शाळांमध्ये देशभक्तीच्या जल्लोषात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार
(सामाजिक संस्थेकडून विद्यार्थ्यांना सायकल वाटप.)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
यवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोन तसेच विद्या विकास मंदिर विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिना निमित्ताने शाळेच्या प्रांगणात आज दि १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ रामचंद्र दोरगे. विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कला व वाणिज्य शाखा यवत तालुका दौंड जिल्हा पुणे.

या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ध्वजारोहण जिल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे यांच्या हस्ते तर शाळा क्रमांक दोनचा ध्वजारोहण पंचायत समिती सदस्य तेजस्विनी पडळकर आणि विद्या विकास मंदिर विद्यालयाचा ध्वजारोहण यवत ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच व प्रशासक समीर दोरगे यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महापुरुषांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत तिरंग्याला मानवंदना दिली.भारतमातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी कवायत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. तसेच देशभक्तीपर गीत सादरीकरण करून उपस्थित नागरीकांचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
प्राथमिक शाळेतील व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची व देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शहिद झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्यात आली स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व, संविधानिक मूल्ये राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि नागरिक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. देशाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन प्रामाणिक, जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ नागरिक बनावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी यवत परीसरातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल पालक व शिक्षकांचेही अभिनंदन करण्यात आले. दरम्यान, सामाजिक बांधिलकी जपत एका सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी मोठी मदत होणार असून, शिक्षणाची वाट अधिक सुकर होणार आहे. या उपक्रमामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात असा दुहेरी सामाजिक संदेश देण्यात आला.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात यवत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष यादव. वि का सोसायटीचे चेअरमन साजिद भाई सय्यद.
माजी उपसरपंच रमेश यादव. दिलीप शेठ यादव. ग्रामपंचायत सदस्य इब्राहिम तांबोळी. गौरव दोरगे. वंचित बहुजन आघाडीचे नेते उत्तमराव गायकवाड. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय डाडर. विद्या विकास मंदिर विद्यालयातील संचालक बाळासाहेब सापळे. मासाळ सर जाधव सर. गणेश दोरगे. भागाआण्णा पवार. माजी चेअरमन आण्णासाहेब दोरगे. बाळासो मलभारे. माजी व्हाईस चेअरमन त्रिंबक रायकर. आदी यवत परीसरातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक. व विद्या विकास मंदिर विद्यालयाचे प्राचार्य सतीश सावंत सर. शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.








