नगर परिषदेत देशभक्तीच्या उत्साहात साजरा झाला 80 वा स्वातंत्र्यदिन
नगराध्यक्षा सौ. सुजाताताई एंड्रलवार यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण
प्रतिनिधी: सतिश घुले
किनवट : देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त किनवट नगर परिषदेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आज दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारत प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षा मा. सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आणि राष्ट्रगीत गायन झाले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपाध्यक्ष तथा नियोजन व विकास समितीचे सभापती मोहम्मद हसन म. नुर खान पठाण व युवानेते करणभाऊ एंड्रलवार उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम सभापती श्रीराम नेम्मानिवार, पाणी पुरवठा सभापती सौ. निलोफर भाटी, स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. आश्विनी जागरलावार, क्रिडा व सांस्कृतिक सभापती सौ. नुरसबा मुकद्दर, महिला व बालकल्याण सभापती सौ. प्रिती नेम्मानिवार व उपसभापती सौ. गुलबख्त खान, नगरसेवक अभय महाजन, नगरसेविका गंगाबाई कोल्हे, स्वीकृत सदस्य तथा शिवसेना उ.बा.ठा. शहरप्रमुख प्रशांत कोरडे, नगरसेवक प्रवीण राठोड, नगरसेविका सौ ललिताबाई मुनेश्वर, नगरसेविका नईमा बेगम मिर्झा सईद बेग, नगरसेविका जरीना खान साजिद खान, नगरसेविका शेख सादिका इम्रान, नगरसेविका निकिता आयनेनिवार, नगरसेविका सरोजिनी ओद्दीवार, स्वीकृत सदस्य साजिद खान निसार खान, नगरसेवक सुरज सातुरवार, नगरसेवक चंद्रशेखर नेम्मानिवार, नगरसेवक श्रीनिवास नेम्मानिवार, नगरसेवक अभय नगराळे, नगरसेवक संतोष मरस्कोल्हे, अशोक भालेराव, मिलिंद घुले, स्वानंद मामीलवाड, नगराध्यक्ष यांचे कायदेविषयक सल्लागार ॲड. दिनेश येऊतकर, राजेश जोशी सर, मुकेश नेम्मानिवार, विष्णू पुजारी, परमेश्वर काचमोडे, यांच्यासह सर्व कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून देशाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी श्री. रोहित उत्तम भगरे व सर्व कर्मचारी वृंद यांनी विशेष मेहनत घेतली.








