यल्लापूरच्या आर्बैल घाटात केलवडच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
पत्नी मनिषा रजपुत यांची निष्पक्ष चौकशी व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
राहता शहर प्रतिनिधी ! हिना उबाळे
राहता तालुक्यातील केलवड येथील 23 वर्षीय तरुण आकाश दशरथ रजपुत या तरुणाचा कर्नाटकातील यल्लापूर तालुक्यातील मोलेपाल आर्बैल घाट परिसरात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
आकाश हा केलवड गावातील एका ट्रकवर मदतनीस चालक म्हणून दुसऱ्या चालकासोबत कामानिमित्त गेला होता.
त्याचा मृतदेह गंभीर सुरुपाच्य जखमांसह आढळून आल्याने हा खून झाल्याचे संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी यल्लापूर पोलिस ठाण्यात भारतीय नाय संहिता 2023मधील कलम 103आणि 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 8वाजल्यापासून 13ऑगस्ट रोजी 8.45 वाजेपर्यंत कालावधीत आर्बल घाट परिसरात ही घटना घडल्याचे समोर आले आहे.तक्रारदार रवी कृष्ण सिद्दी. रा. कोड लगूडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस उप निरीक्षक.राजशेखर वंदाली यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मय तरुणाची ओळख आकाश दशरथ राजपूत रा. केलवड तालुका राहता अशी पटली आहे आकाश हा रोजगाराच्या निमित्ताने ट्रक सोबत गेला होता.
प्रवासादरम्यान त्याचा मृतदेह आढळून आल्याने राहता तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पत्नीची सखोल चौकशीची मागणी
मेहता आकाश यांची पत्नी मनीषा आकाश राजपूत यांनी या घटनेची निष्पक्ष आणि सकल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
15 ऑगस्ट रोजी त्यांनी राहतात निवेदन दिले मनीषा दजपुत यांनी निवेदनात आपल्या पतीचा बाहेरील राज्यात संशयास्पद मृत्यू झाला असून हा खून असल्याचा संशय असल्याने संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी करावी व दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
तसेच मयताचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने शासनाकडून तातडीने आर्थिक मदत आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे.
रास्ता रोको आंदोलन प्रशासनाची मध्यस्थी
या घटनेनंतर मयताच्या कुटुंबीयांसह केलवड येथील नागरिकांनी न्याय साठी आवाज उठवत आंदोलन केले आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे पोलीस कर्मचारी संदीप उदावंत तसेच पोलीस पदक बंदोबस्त ठेवला.
स्थानिक नेते आणि प्रशासनाने मध्यस्थी करत या प्रकरणाचा पाठपुरावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्याचे आश्वासन दिले तसेच तहसीलदारांच्या माध्यमातून माहितीच्या कुटुंबाला शक्यती मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्त गीत करण्यात आले.
पंधरा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.








