जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु.कॉलेज म्हसला खुर्द मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न
जिल्हा प्रतिनिधी उज्वल जैस्वाल
म्हसला खुर्द : दि.15 ऑगस्ट राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड, बुलडाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज म्हसला खुर्द धाड मध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. संदीपदादा शेळके तसेच देशासाठी कर्तव्य बजावणारे आजी-माजी सैनिक यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये रवींद्र थोरात करडी, रामकृष्ण तायडे म्हसला खुर्द, सुनील सुसर जांब, सुनील खंडागळे जांब, सुभेदार सुनील हिवाळे सातगाव, विष्णू धंदर उच्च श्रेणी मुख्याध्यापक, रामचंद्र खांडवे धाड, नितीन उबाळे, धनंजय बुधवत,तुषार डोडिया बुलढाणा, शुभम काळे मौंडाळा, शुभम सुसर कुलमखेड,शिवाजी जाधव मौंडाळा, विशाल गावंडे, ज्ञानेश्वर उबाळे, किशोर पालकर, प्रवीण यंगड, योगेश पालकर, तुळशीराम काकडे, रमेश आमले, मारुती कचाटे, दादाराव भोंडे, प्रवीण लोखंडे, नितीन जामुंदे, शालिकराम काकडे, नितीन तायडे, दिपक हिवाळे, प्रवीण भवटे, गणेश तायडे, आकाश जाधव,अनिल ब्राह्मणे आनंदा वाघ, गणेश वाघ, पुजा लवंगे, पदमा सुसर आदी मंडळी उपस्थित होते.
यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या देशभक्तीपर गीत चारोळी व आपल्या मनोगतातून उपस्थित मान्यवरांचे कौतुक मिळवले.
यानंतर शाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर भुसारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. यावेळी उपस्थित सैनिक शुभम सुसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व स्वतःला आलेले अनुभव, खडतर परिस्थितीतून प्राप्त केलेले यशाचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला, तसेच करडी येथील माजी सैनिक रवींद्र थोरात यांनी सुद्धा विद्यार्थ्यांसमोर आपले मनोगत व्यक्त केले, तसेच यावेळी उपस्थित माजी सैनिक सुनील हिवाळे असे म्हणाले की, आपण ज्याप्रमाणे राष्ट्रीय सण उत्सव साजरे करतो त्याप्रमाणे एखाद्या सैनिक अशा प्रकारे सण उत्सव साजरा करत नाही कारण तो सीमेवरती उभा असतो हे व इतर अनेक अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले,
यावेळी नवीनच भारतीय सैन्य दलामध्ये रुजू झालेले शुभम काळे यांनी सुद्धा विद्यार्थी-दशकातील आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले शिक्षकांचा आदर करावा आई-वडिलांचे ऐकावं व मोठे बनाव असे ते म्हणाले.
यावेळी उपस्थित उच्च श्रेणी मुख्याध्यापक विष्णू धंदर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले विज्ञान प्रदर्शनामध्ये दोन वेळा राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा योग मला आला. आज जिजाऊ ज्ञान मंदिरच्या सर्वच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषण सादर केले त्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना रोख बक्षीस यावेळी देण्यात आले. तसेच इतरही मान्यवरांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये संदीप दादा शेळके असे म्हणाले की, आपण जे भारतामध्ये आनंदाने, सुखाने राहतो त्यामागे प्रत्येक सैनिकाचे कर्तव्य त्याची निष्ठा व पराक्रम, अभिमान या गोष्टी त्यामागे असतात, राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून स्वातंत्र्याला ज्यावेळेस 75 वर्ष पूर्ण झाले त्यावेळी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला त्यावेळेस 5000 आजी-माजी सैनिकांचा सत्कार आपण केला, त्यांच्या प्रति आदरातून हे कार्य पूर्ण झाले,येणाऱ्या काळामध्ये गुणवत्ता युक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून आपण करणार आहोत स्पोर्ट हब, उत्कृष्ट विज्ञान लॅब, कॉम्प्युटर लॅब, ग्रंथालय, त्याचप्रमाणे संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचा मानस आमचा आहे,विद्यार्थ्यांचे भावनिक नातं हे शिक्षक व शिक्षिका यांच्यासोबत जास्त असते आजचा विद्यार्थी Gen-Alpha,Gen-beta,Gen-Z त्यांचे instagram त्यांचे सोशल मीडिया यांच्यावर त्यांचं वर्तन आपल्याला कळते, अतिशय हुशार अशी ही पिढी आहे त्यामुळे शिक्षका- बरोबर पालकांनाही विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे असे म्हणत अध्यक्ष भाषण संपवले.
या कार्यक्रमावेळी वर्ग पाचवी मधील स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शाळेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या मुख्यमंत्री कल्याणी वाघ या विद्यार्थीनीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण म्हस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन अभिजीत ठाकूर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी बहुसंख्य पालकांची उपस्थिती होती व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान लाभले.








