जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु. कॉलेज प. भट मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न
जिल्हा प्रतिनिधी उज्वल जैस्वाल
दि.15ऑगस्ट राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड, बुलडाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट मध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. भाऊसाहेब शेळके (बाबा) यांचे हस्ते करण्यात आले तर या प्रसंगी बहुसंख्य पालकांची उपस्थिती होती.
यावेळी मो. अयान मो. जावेद याने भाषण करुन उपस्थितांची दाद मिळवली. तर मयूर तायडे याने छान गीत सादर करुन बक्षीस मिळवले. यानंतर इयत्ता 7 वी व इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती धारक 19 विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरण करीत स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना भाऊसाहेब शेळके म्हणाले की, आज जिजाऊ ज्ञान मंदिर शाळेकडे बघतांना उर अभिमानाने भरून येतो. इथे चांगल्या प्रकारचे शिक्षण प्रशिक्षण आज मिळत आहे. यावर्षीचा जिल्हा क्रिडा अनुदान पुरस्कार शाळेस मिळाला. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मीळाली याचं खुप कौतूक आहे. यात शिक्षक व पालकांचाही खुप वाटा आहे. तर विद्यार्थ्यांना संदेश देताना भाऊसाहेब म्हणाले की, आई- वडीलांना जपा, त्यांची आज्ञा पाळा, तेच आपले दैवत आहेत. तर आई वडीलांनीही विद्यार्थ्यांसमोर भांडू नये कुठलेही व्यसन करु नये. असे ते म्हणाले. यानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. शेवटी विद्यार्थीना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.








