लॉयन्स क्लब ज्ञानगंगा, नांदुरा आयोजित ‘रंग दे तिरंगा’ आंतरशालेय नृत्य व नाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न
जिल्हा प्रतिनिधी उज्वल जैस्वाल
नांदुरा : लॉयन्स क्लब ज्ञानगंगा, नांदुरा यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘रंग दे तिरंगा’ आंतरशालेय नृत्य व नाट्य स्पर्धा 2026 चे आयोजन शनिवार, दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. नांदुरा शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्ती, महिला सक्षमीकरण, सामाजिक जागृती, राष्ट्रीय एकात्मता तसेच भारताच्या गौरवशाली इतिहासावर आधारित विविध नृत्य व नाट्य सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली.
या स्पर्धेत श्री शिवाजी विद्यालय, कोठारी माध्यमिक कन्या शाळा, हिंदोस्ता ई-टेक्नो स्कूल, कोठारी इंग्लिश कॉव्हेंट, के.डी. इंग्लिश स्कूल, श्रीमती मायाताई ठाकरे इंग्लिश हायस्कूल, श्री संत जंगली महाराज स्कूल, अजित इंटरनॅशनल स्कूल, भारतीय ज्ञानपीठ विद्यालय, सेंट ॲन्स इंग्लिश हायस्कूल आणि श्रीमती तुळशीबाई रंगलालजी झांबड विद्यानिकेतन यांसह विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांनी ‘Journey of Woman’, ‘वंदे मातरम्’, ‘स्वच्छ, सुंदर, सुरक्षित भारत’, ‘Tribute to Indian Women’s Cricket Team’, ‘आझाद हो’, ‘तिरंगा’, ‘ऑपरेशन सिंदूर’, ‘भारत की बेटी’, ‘भारत-पाकिस्तान बटवारा’, ‘माँ से है माटी’ यांसारख्या विविध विषयांवर उत्कृष्ट नृत्य व नाट्य सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि देशभक्तीच्या भावनेला या माध्यमातून सुंदर व्यासपीठ मिळाले.
या कार्यक्रमाला मा. आ. चैनसुखजी संचेती, नगर परिषद मुख्याधिकारी मिलिंद दारोकार साहेब, ZC MJF लॉ. महेश चांडक, MJF लॉ. तेजस झांबड, भाजपा शहराध्यक्ष प्रमोद हिवाळे, नगरसेवक अनिल जागळे, विनायक बोडखे तसेच लॉ. सुनीलभाऊ तांदळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आयोजन लॉयन्स क्लब ज्ञानगंगा, नांदुराचे अध्यक्ष लॉ. रोशन पांडव, सचिव लॉ. कोमल सुपे, कोषाध्यक्ष लॉ. प्रकाश वानखडे, प्रकल्प प्रमुख लॉ. डॉ. देवेश नवगजे, तसेच लॉ. नितीन सातव, लॉ. अनंता वडोदे आणि लॉ. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी लॉ. गजानन तांदळे, लॉ. इंद्रपाल सिंग बग्गा, MJF लॉ. डॉ. सागर अग्रवाल, लॉ. विशाल पांडव, लॉ. विशाल पूर्णय, लॉ. अनुज मुंधडा, लॉ. नंदू जुमले, लॉ. नीलेश पाउलझगडे, लॉ. संदीप हरगुनानी, लॉ. मंगेश कासार, लॉ. मनोहर मिहाणी, लॉ. वैभवराज माळी, लॉ. राजेंद्र नागलकर तसेच लॉयन्स क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्य, सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिका आणि विविध विषयांवरील कलाविष्कारामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘रंग दे तिरंगा’ हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे आणि देशभक्तीची भावना रुजविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असून, विद्यार्थ्यांना असे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे उपक्रम लॉयन्स क्लब ज्ञानगंगा, नांदुरा यांच्या वतीने यापुढेही सातत्याने राबविण्यात येतील, असे अध्यक्ष लॉ. रोशन पांडव यांनी सांगितले.








