शेरी-चिखलठाण येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात
प्रतिनिधी : प्रमोद डफळ
राहुरी : राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील शेरी-चिखलठाण येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी क्र. ६० मध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शबनम शेख हिचा विशेष गुणगौरव करून जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी सहकार्य करणाऱ्या युवक व ग्रामस्थांचा स्वागत-सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक खरमाळे सर, दूधवडे सर, अंगणवाडी सेविका मंगल सोपान काकडे, तसेच बिस्मिल्ला युनूस शेख, संजय काकडे, बाळासाहेब तात्या काकडे, सारंग काकडे, दिलीप काकडे, प्रकाश विकास काकडे, अंकुश काकडे, आप्पासाहेब काकडे, बाबाजान शेख, नदीम शेख, एकनाथ काकडे, कांचन काकडे, पोपट काकडे, महेंद्र काकडे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतला.
ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.








