शेतकरी संघटनेची भडगाव तालुका कार्यकारिणी जाहीर-सचिव पदी डॉ. योगेश गोसावी यांची निवड
प्रतिनिधी : डॉ. योगेश गोसावी
भडगाव : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने शेतकरी संघटनेची भडगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी शासकीय विश्रामगृह, भडगाव येथे झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष अखिलेश रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यावेळी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप दादा पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद धनगर, चाळीसगाव तालुका अध्यक्ष दिलीप पाटील तसेच लोकमतचे पत्रकार अशोक परदेशी उपस्थित होते.
भडगाव तालुका कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी वाल्मीक प्रभाकर लोखंडे (बांबरुड प्र. उ.) व धनराज तुकाराम पाटील (पिचर्डे), कार्याध्यक्षपदी सतीश युवराज पाटील (गोंडगाव), सचिवपदी डॉ. योगेश युवराज गोसावी (वाडे) यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच सरचिटणीसपदी सरदारसिंग जयसिंग पाटील (वडधे), समाधान भगवान पाटील (वाक) व रामकृष्ण जगन्नाथ माळी (वाडे), संघटकपदी संजय केशव खैरनार (बांबरुड प्र. उ.), तर चिटणीसपदी योगेश शालिक पाटील (बांबरुड प्र. उ.) व गणेश राजेंद्र जावरे (बात्सर) यांची नियुक्ती करण्यात आली.
युवक आघाडीचीही घोषणा..
शेतकरी संघटनेच्या युवक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी लिलाधर कल्याणराव पाटील (वाक), उपाध्यक्षपदी सागर माधवराव पाटील (बांबरुड), सचिवपदी योगेश खुशाल पाटील (बात्सर) तर सरचिटणीसपदी नरेंद्र संभाजी पाटील (वाक) यांची नियुक्ती करण्यात आली.
याशिवाय ज्येष्ठ संघटकपदी संजय वेलजी पाटील (पिचर्डे) व प्रकाश कोतकर, तर सदस्यपदी जितेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे, शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, पीक नुकसान व अतिवृष्टीसह विविध समस्यांवर आवाज उठविणे आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








