पुणे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या हस्ते स्थानिक गुन्हे शाखा पोलीस श्री गुरुनाथ गायकवाड यांना भारत सरकार तर्फे उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित
दौंड प्रतिनिधी : अनिल गायकवाड
दि. १५ ऑगस्ट २०२६ स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारत सरकारच्या वतीने पोलीस खात्यात सेवा व कर्तव्य करीत असलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावल्या बद्दल पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी श्री.गुरुनाथ गायकवाड यांना भारत सरकार तर्फे पुणे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
पोलीस खात्यातील उत्कृष्ट कामगिरी बजावणारे पोलीस अधिकारी श्री.गुरुनाथ गायकवाड यांना पोलीस विभागातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी उत्कृष्ट सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या हस्ते गुरुनाथ गायकवाड यांना हे पदक प्रदान करण्यात आले. पोलीस खात्यातील कर्तव्यनिष्ठा उत्कृष्ट कामगिरी आणि उल्लेखनीय सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला
गायकवाड यांनी पोलीस सेवेत कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उल्लेखनीय कामगिरीच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध गुन्ह्यांच्या तपासात तसेच गुन्हेगारांचा शोध घेऊन अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये चोरी घरफोडी दरोडा गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार व त्यांचे साथीदार या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून पोलीस गुरुनाथ गायकवाड त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत भारत सरकारच्या वतीने त्यांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. या सन्मानाबद्दल पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर तसेच पोलीस खात्यातील पोलीस मित्र मित्रपरिवार व ग्रामीण भागातील नागरिकांकडून गुरुनाथ गायकवाड यांच्या पोलीस खात्यातील कामगिरी व कर्तव्य बाबत अभिनंदन करण्यात आले आहे.








