राजापूर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
लक्ष्मण घुगे राजापूर प्रतिनिधी
येवला तालुक्यातील राजापूर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व्यवस्थापन समितीचे सदस्यांनी ध्वज पूजन केले तर ध्वजारोहण समितीचे शरद आव्हाड यांनी केले. ज्ञानप्रकाश आश्रम शाळेचे ध्वजारोहण उपसरपंच नामदेव पवार यांनी केले पर्णकुटी जय जवान जय किसान ग्रुपचे ध्वजारोहण सेवानिवृत्त सैनिक योगेश मुंडे व नितीन वाघ यांनी केले ग्रुप ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच लताबाई जाधव यांनी केले विकास सोसायटीचे ध्वजारोहण चेअरमन मच्छिंद्र चव्हाण यांनी केले. माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहण सुरेखा लोधे, वाघ यांनी केले वाघ वस्ती शाळेचे ध्वजारोहण दीपक अलगट यांनी केले.
राजापूर वन विभागातील ध्वजारोहणवन समितीचे गोरख सानप यांनी केले राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ध्वजारोहण वैद्यकीय अधिकारी अक्षय नवगिरे यांनी केले. अलगट वस्तीशाळेचे ध्वजारोहण शांताराम अलगट यांनी केले. हवालदार वस्ती शाळेचे सैनिक गणेश वाघ यानी केले. नाईक वस्ती शाळेची ध्वजारोहण नवनाथ अलगट यांनी केलेभैरवनाथ वाडी शाळेचे ध्वजारोहण सेवानिवृत्त सैनिक शांताराम भोरकडे यांनी केले. गणाधीश इंटरनॅशनल स्कूल या विद्यालयाच्याशाळेचे ध्वजारोहण प्रज्वल धात्रक यानी. केले तर माध्यमिक विद्यामंदिर राजापूर या विद्यालयाचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येवला तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण घुगे होतेशिष्यवृत्ती व खेळामध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे संचालक संपत वाघ व रमेश वाघ यांनी केला यावेळी गावातील आजी-माजी सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








