वड्री गावात उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा
माध्यमिक विद्यालय, मराठी शाळा व ग्रामपंचायतीत ध्वजारोहण; विद्यार्थ्यांनी सादर केले सांस्कृतिक कार्यक्रम
प्रतिनिधी : बशीर तडवी
यावल : तालुक्यातील वड्री येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. वड्री माध्यमिक विद्यालय तसेच ग्रामपंचायत, विकास सोसायटी आणि मुला-मुलींच्या मराठी शाळेत ध्वजारोहण करण्यात आले.
वड्री माध्यमिक विद्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विद्यालयाचे चेअरमन विलास सर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक परविन तळले सर, मेघे सर, राणे सर, प्रशांत सर, सलमा मॅडम, सुनंदा मॅडम, सुरेश सर,जितेंद्र चौधरी सर, शिपाई उमाकांत सुरवाडे, प्रशांत रमेश सावळे, दीपक चौधरी,सजय तडवी, यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीत, भाषणे व कला सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
तसेच ग्रामपंचायत व विकास सोसायटी, मुला-मुलींची मराठी शाळा येथेही १५ ऑगस्टनिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वड्री गावाचे सरपंच अजय भालेराव, उपसरपंच पंकज दिनकर चौधरी, माजी सरपंच ललित चौधरी, विकास सोसायटीचे चेअरमन उमाकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य सलमा फकीरा, ग्रामपंचायत रोजगार सेवक फकीरा अरमान तडवी, ग्रामपंचायत ऑपरेटर तनुजा तडवी, हुसेन साहेब, कमाल कान्हा, रमेश सावळे, लीलाधर चौधरी, वसंत चौधरी, प्रकाश वासुदेव चौधरी, अरुण पाटील, दगडू काशिनाथ, निवृत्ती डॉक्टर, आशा वर्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय कर्तव्याची भावना निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वड्री गावातील स्वातंत्र्यदिनाचा सोहळा आनंदात आणि उत्साहात पार पडला.








