तामसामध्ये तिरंगा रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला सहभागी
हदगांव : गौतम कदम
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तामसा शहरात काल भारतीय जनता पार्टी, हदगाव पूर्व मंडळाच्या वतीने भव्य _तिरंगा रॅली_ चे आयोजन करण्यात आले. तामसा शहरात प्रथमच झालेल्या या रॅलीस हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत देशभक्तीचा जल्लोष केला,ही तिरंगा रॅली भाजपचे तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांच्या नेतृत्वात पार पडली.

तिरंगा रॅलीस भाजपा जिल्हाध्यक्ष अँड. किशोर देशमुख, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष मंगाराणी आंबुलगेकर,जिल्हा सरचिटणीस रामचंद्र मुसळे,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र केशवे,वर्षाताई बंडाले,सुप्रिया मुनेश्वर,सूर्यकांत हनवते,भास्कर डोईबले, कृषी व्यापारी असोसिएशनचे गोविंद जांभळेकर,गजानन लाभसेठवार,गोविंद निल्लावार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
तिरंगा रॅली सकाळी 10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक जुने बसस्टँड येथून सुरू झालेल्या या रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन बस स्टँड परिषद तामसा येथे झाली, तिरंगा रॅलीत सहभागी सर्वांच्या हातात तिरंगा घेऊन “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. रॅलीत हजारो शालेय विद्यार्थी, नागरिक, माता-भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे गुरु दिगंबरस्वामी प्राथमिक विद्यालय, विद्यासागर मुलींचे हायस्कूल,पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळांतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्धपणे सहभाग घेतला, या सर्व शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
रॅली यशस्वी करण्यासाठी पुढील पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतला.
डॉ. संदीप कारंजकर, तालुका सरचिटणीस विशाल परभणकर, युवा मोर्चाचे देवानंद वानखेडे, ओबीसी मोर्चाचे ओम इदेवार, महिला मोर्चाच्या ममता जोशी, हिना जोशी,आदिवासी मोर्चाचे बालाजी मेटेवाड, शिक्षक सेलचे दिनेश तवर,तामसा शहराध्यक्ष शिवराज वारकड, तालुका कार्यकारणी पदाधिकारी शशिकांत बंडावार, डॉ. दीपक नाईक, अवधूतराव कदम, लक्ष्मन पवार, गजानन चव्हाण, अविनाश कदम, संजय सोमेवाड, सचिन तांदळे, अर्जुन जोशी, पांडे सर, लकी कोठोले, विजय कसेवाड, सतीश डोंनगे, अनिल देवसरकर, महेश मठपती.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला तामसाकरांनी तिरंगा रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपच्या सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.








