कारवाडीत स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात; जिल्हा परिषद व न्यू इंग्लिश स्कूलला भारताचे संविधान सप्रेम भेट
कारवाडी (ता. कोपरगाव): भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त कारवाडी (ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूल कारवाडी यांना भारताचे संविधान भेट देऊन एका स्तुत्य उपक्रमाची नोंद करण्यात आली.
कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक व समाजसेवक शंकर अण्णा फटांगरे भारतीय जनसंसद कोपरगाव तालुका अध्यक्ष कारवाडी तंटामुक्ती अध्यक्ष कारवाडी तंटामुक्ती पुरस्कार प्राप्त सरपंच मंगेश भानुदास लोहोकरे, उपसरपंच सचिन वसंतराव क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बन्सीघे घेगङमलआणि कारवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेशचे कोपरगाव तालुका उपाध्यक्ष तथा प्रतिनिधी प्रकाश गोविंद शिंदे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा तसेच न्यू इंग्लिश स्कूल कारवाडी यांना भारताचे संविधान भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने दिलेल्या या मौल्यवान भेटवस्तूबद्दल शाळा प्रशासन, शिक्षकवृंद व ग्रामस्थांच्या वतीने प्रतिनिधी प्रकाश गोविंद शिंदे यांचे मनापासून आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये:
संविधान भेट उपक्रम: विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांना भारताचे संविधान भेट देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती: सरपंच मंगेश भानुदास लोहोकरे, उपसरपंच सचिन वसंतराव क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बन्सीघे गडमल यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्साही वातावरण: शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
बातमी वृत्तसंकलन: प्रकाश गोविंद शिंदे (प्रतिनिधी – राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश, कोपरगाव तालुका उपाध्यक्ष)








