हाजी अन्वर खाटीक यांची रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती
२० वर्षांच्या संघटनात्मक कार्याची दखल; पक्षविचार तळागाळात पोहोचवण्याचा निर्धार
प्रतिनिधी : बशीर तडवी
फैजपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, फैजपूर नगरसेवक तथा जिल्हाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाज जळगाव हाजी अन्वर खाटीक यांची रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. गेल्या सुमारे दोन दशकांपासून पक्षसंघटनेत सातत्याने सक्रिय राहून केलेल्या संघटनात्मक कार्याची दखल घेत हाजी अन्वर खाटीक यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
“ही नियुक्ती माझ्यासाठी केवळ पद नसून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याची, अधिक जोमाने काम करण्याची आणि माझे कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध करण्याची नवी संधी आहे,” अशी प्रतिक्रिया हाजी अन्वर खाटीक यांनी व्यक्त केली.
वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केलेल्या हाजी अन्वर खाटीक यांच्या सार्वजनिक जीवनाला आता सुमारे २० वर्षे पूर्ण होत आहेत. माजी खासदार व आमदार ईश्वर बाबुजी जैन तसेच भडगावचे प्रसिद्ध उद्योजक स्व. दादासो मुनाफ सेठ यांच्या सहवासातून सामाजिक चळवळीची प्रेरणा मिळाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी पक्षाच्या माध्यमातून सक्रिय राजकीय व संघटनात्मक कार्य सुरू केले.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास फैजपूर शहराध्यक्षपदापासून नगरसेवक आणि आता रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष या महत्त्वाच्या जबाबदारीपर्यंत पोहोचला आहे. या प्रवासात अनेक राजकीय चढ-उतार आले; मात्र पक्षाच्या विचारांशी आणि संघटनेशी असलेली निष्ठा कधीही ढळू दिली नाही, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य मानले जाते.
वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ
या प्रदीर्घ कार्यकाळात शरद पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभले. विशेषतः माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सामान्य कार्यकर्त्याला घडवून महाराष्ट्रातील संघटनात्मक राजकारण समजून घेण्याची आणि राज्यभर काम करण्याची संधी दिल्याचे हाजी अन्वर खाटीक यांनी नमूद केले.
फैजपूर शहराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवला. त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागांत दौरे करताना हजारो विद्यार्थी, युवक, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील सहकाऱ्यांशी संपर्क निर्माण झाला. या माध्यमातून पक्षाचे संघटनात्मक जाळे विस्तारण्यास मोठी मदत झाली.
रावेर लोकसभेत संघटन विस्ताराला प्राधान्य
नवीन जबाबदारीच्या माध्यमातून रावेर लोकसभा जिल्ह्यात पक्षाच्या विविध फ्रंटल संघटना व सेल यांच्यात समन्वय साधणे, त्यांचे संघटनात्मक काम अधिक प्रभावी करणे, जिल्ह्यातील संघटनबांधणीचा आढावा घेणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद ठेवणे आणि पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे, यावर भर देणार असल्याचे हाजी अन्वर खाटीक यांनी सांगितले.
“सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांपासून सुरू झालेला माझा संघटनात्मक प्रवास आता व्यापक जबाबदारीपर्यंत पोहोचला आहे. गेल्या २० वर्षांत मिळालेला अनुभव, महाराष्ट्रभर निर्माण झालेले सहकाऱ्यांचे नेटवर्क आणि पक्षाच्या विचारांवरील निष्ठा यांचा उपयोग रावेर लोकसभा जिल्ह्यात संघटना मजबूत करण्यासाठी करणार आहे. आगामी काळात अधिक आक्रमकपणे, सातत्याने आणि निष्ठेने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची विचारधारा रावेर लोकसभा मतदारसंघासह उत्तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अनेक नेत्यांचे विशेष आभार
या नियुक्तीबद्दल हाजी अन्वर खाटीक यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री दिलीप वळसे-पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांच्यासह पक्षातील सर्व वरिष्ठ नेते, आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
तसेच माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, माजी मंत्री सतीश अण्णा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, स्व. युवराज काका पाटील, माजी जिल्हाध्यक्ष भिलाभाऊ सोनवणे, माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे, जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, आमदार मनीषदादा जैन, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे, सुहासभाऊ उभे, माजी नगराध्यक्ष विजय चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेशभाऊ वानखडे, माजी युवक जिल्हाध्यक्ष राजेश दत्तू पाटील, विष्णुभाऊ भंगाळे, शितलभाऊ साळी, परेशभाऊ कोल्हे, माजी नगरसेवक जफर मेंबर, माजी नगरसेवक जलील मेंबर, महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, संजय चव्हाण, माजी नगरसेवक कुर्बानभाई, तसेच हाजी मोहसिन आणि हाजी मुनाफ यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.
या नियुक्तीसाठी ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे, ईश्वर बाबुजी, मेहबूबभाई शेख, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष अफजल फारुकी, कार्याध्यक्ष वारीस खान, निरीक्षक आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हा नेते तथा उद्योजक श्रीरामदादा पाटील, माजी निरीक्षक प्रसनजीत पाटील, बुलढाणा जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, अशोकभाऊ लाडवजारी आदींनी दिलेल्या पाठबळाबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
हाजी अन्वर खाटीक यांच्या नियुक्तीमुळे रावेर लोकसभा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक हालचालींना अधिक वेग येण्याची आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना नव्या नेतृत्वाची ऊर्जा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.








