राष्ट्रीय भारत एकता सन्मान पुरस्काराने झेप फाउंडेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष कांताभाऊ राठोड सन्मानित
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या ८०व्या पवित्र्य वर्धापन दिनाचे औचित्य साधत संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य व झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय भारत एकता सन्मान पुरस्कार २०२६ पुणे येथील नवी पेठ पत्रकार भवन येथे संपन्न झाला.
देश हिताचा विचार करणारे देशासाठी विविध क्षेत्रात कार्य करणारे कार्यरत असणारे सर्व सामाजिक ,कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचा यथोचित असा सन्मान त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात नरसिंहपूर गावचे सुपुत्र कांताभाऊ राठोड यांना राष्ट्रीय भारत एकता सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे शुभहस्ते मा. भरत कुंभार घातक कमांडर कारगिल योद्धा , मा. अजय थाप्पा गोरखा बटालियन कारगिल युद्धा
प्रमुख पाहुणे मा. योगेश भाऊ धावडे गोल्डन मॅन महा. चॅम्पियन प्रमुख आकर्षण मा. स्वातीताई महाडिक पुणेकर लावणी नृत्यांगना, प्रमुख उपस्थिती शिवभक्त ,साहित्यरत्न, डॉ.गणेश राऊत संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अखिल भारतीय छावा संघटना, सहसंपादक अजिंक्य महाराज न्यूज चैनल, लोकसेवक मा.कांताभाऊ राठोड झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यक्षेत्र ( संपूर्ण भारत ) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव व अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संजय धर्म, गोपाळ भालेराव, हंशराज पाटील, गणेश तारू व अजिंक्य टीम उपस्थित होती.
मान्यवरांच्या उपस्थितीत झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक/अध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ ( कार्यक्षेत्र संपूर्ण भारत ) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव पोलिस तपास क्राईम रिपोर्टर बाळकडू, सेवाशक्ती, सुवर्णयुग दैनंदिन वृत्तपत्र पत्रकार कांताभाऊ राठोड व विविध क्षेत्रातील पुरस्काराथी डॉ.नितीनकुमार शिंदे, डॉ .अर्चना जोशी, मा .संजय कारंडे डॉ. राकेश रामराजे, डॉ. करण राठोड संपादक मा.संतोष लांडे श्रीमती. शारदा सरोदे, प्रा.अमरदीप रामराजे, कुमारी. सीमा काशीकर
मा.सचिन काष्टे , सौ. रूपाली जोशी ,मा. यांना फ्रेम, मेडल, सन्मानपत्र, तिरंगा पट्टी देऊन सन्मानित करण्यात आले.
एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात कशा अर्थाने असते याची सुरुवात नरसिंहपूर गावचे कांता भाऊ राठोड यांनी खरी करून दाखवलेली आहे पुणे येथे नोकरी करत असताना नोकरीबरोबर पत्रकारिता करत त्यांनी समाज सेवा, झेप फाउंडेशन पुणेची सुरुवात केली आज त्यांचे फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्र भर काम करते महाराष्ट्रभर ओळखले जाते महाराष्ट्रभर त्यांचे आज पदाधिकारी आहेत या सर्वांच्या टीमच्या ताकतीने त्यांची संस्थां नावा रूपाला आलेले आहे संस्थेमार्फत समाजसेवा, शिक्षण आरोग्य ,गोरगरीब विद्यार्थी ,वृक्षारोपण ,अनाथ आश्रम अशा विविध वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकाची कामे केली जातात . आरोग्य शिबिरे ,साक्षरता शिबिरे असे लोकउपयुक्त कार्यक्रम राबवले जातात व त्यांना मदत केली जाते व बाहेरून सुद्धा मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. पत्रकार म्हणून सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे तसेच एखाद्या प्रकरणाचा तळागाळापर्यंत शोध घेऊन तो जनतेसमोर आणण्याचे काम केलेल आहे व लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे.
यावेळी प्रमुख मान्यवर तसेच पुरस्काराथी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या पुरस्कर वितरण कार्यक्रमाचे आयोजन संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य व झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले. प्रशांत महाजन सर यांनी आभार प्रदर्शन केले.








