नगरसूल येथे ‘जय किसान,जय जवान’ उपक्रमातून, वृक्ष लागवड व शेतकरी व माजी सैनिकांचा सन्मान..
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
राजापूर : पारादीप फॉस्फेट लिमिटेड,जय किसान कपंनी तर्फे व सप्तशृंगी कृषी सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नगरसूल येथे स्वातंत्र्य दिन तसेच सप्तशृंगी कृषी सेवा केंद्राच्या ३१व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘जय किसान, जय जवान’ या संकल्पनेतून परिसरातील प्रगतशील शेतकरी व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे विपणन अधिकारी वृषभ ठणके यांनी केली. त्यांनी कंपनीच्या नवीन उत्पादनांची माहिती देतानाच आगामी रब्बी हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.यावेळी माजी सैनिक अनिल वरे यांनी मनोगत व्यक्त केले. सैनिकांच्या योगदानाची आठवण करून देत देशसेवा आणि शेतकरी सेवेला महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास सप्तशृंगी कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर सुनील निकम व भरत निकम,मा. सरपंच राजेंद्र पगारे , युवा नेते सुनील पैठणकर, सोसायटीचे चेअरमन विकास निकम,मा. सरपंच राजेंद्र पैठणकर,धनंजय पैठणकर,जेष्ठ शेतकरी बद्रीनाथ बहादुरे, कंपनी प्रतिनिधी देवडे साहेब, विकास गोरे यांच्यासह प्रगतिशील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांचा सन्मान आणि वृक्षारोपणाच्या उपक्रमातून देशभक्तीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.








