विखे परिवारावर टीका थांबवा, अन्यथा सडेतोड उत्तर देऊ
भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे, यांचा राजेंद्र पिपाडा यांना इशारा
प्रतिनिधी : हिना उबाळे
राहता : तालुक्यात डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असलेल्या पिके वरून राजकीय वातावरण तापले आहे.
राजेंद्र पिपाडा यांनी गेल्या काही दिवसापासून डॉ. सुजय विखे पाटील यांना लक्ष करत सोशल मीडियावर वक्तव्य केली आहेत. यावर विखे समर्थक आणि भाजप पदाधिकाऱ्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आले आहे.
भाजपचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी पिपाडा यांना इशारा देताना विखे परिवारावर टीका थांबवावी, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे
विखे परिवार सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुखात कायम सहभागी असतो. विखे पाटलांवर प्रेम करणारी जनता त्यांच्यावर होणारी टीका सहन करणार नाही. आम्ही भाजप पदाधिकारी विखे परिवाराला दैवत मानतो. आमच्या संस्कारामुळे आम्ही शांत आहोत. मात्र पुढे जीभ घसरून देऊ नका, असा इशारा सचिन शिंदे यांनी दिला.
दरम्यान, या प्रकरणावर राधाकृष्ण विखे पाटील किंवा डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रक्रिया आलेली नाही.
सचिन शिंदे यांनी राजेंद्र पेपर यांना उपरोधिक टोला लगावत, कुत्ते भोकते है, हत्ती चलता है, असेही म्हटले आहे
या वादामुळे राहता आणि शिर्डी परिसरातील राजकीय वातावरण आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








