मौज नांदुर गावचे हद्दीत गावठी हातभट्टीचे दारूचे उत्पादन विक्रीसाठी करणाऱ्यावर कारवाई
७७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त; यवत पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी: अनिल गायकवाड
दौंड : तालुका यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नांदुर ता दौंड जिल्हा पुणे गावचे हद्दीत बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूच्या भट्टीवर दोन हजार लिटर उत्पादन दारु तयार करून विक्रीसाठी ठेवणाऱ्या आरोपी विरुद्ध दि १८/०८/२०२६ रोजी ४:३० वाजे सुमारास मौजे नांदुर ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत पवार रिसोर्टच्या समोर ओढयाचे कडेला हि कारवाई करण्यात आली आहे.
यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी गुरूनाथ युवराज गायकवाड, वय ४४ वर्ष, व्यवसाय नोकरी, पोलीस.हवालदार नेमणुक. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण. यांचे तक्रारीवरून गुन्हा रजि. नं.व कलम ८४८/२०२६ भा.न्या.सं.कलम १२३. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ख), (ग).(च) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीचे नाव अमित दुला गुडदावत वय ३० वर्षे, रा खामगाव गाडामोडी,ता.दौंड जि.पुणे.असे आहे.
या कारवाई मध्ये मिळून आलेला मुद्देमाल १) ७० हजार रुपये किंमतीचे ०२ लोखंडी मोठे बॅरल प्रत्येक बॅरलमध्ये एक हजार लिटर प्रमाणे त्यामध्ये अंदाजे दोन हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायन प्रत्येकी लिटरची किंमत ३५ रूपये प्रमाणे २)५ हजार रूपये किंमतीची गोलाकार अँल्युमिनीअमची थाळी ३) ८०० रुपये किंमतीचा गोलाकार अँल्युमिनियम चाटू ४) १ हजार ४०० रुपये किंमतीचे २ मन लाकडी सरपण.असे एकुण ७७ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हकिकत वर नमुद केले ता.वेळ व ठिकाणीं यातील आरोपी मजकूर हा मानवी शरीरास नशाकारक किंवा अपायकारक गावठी हातभट्टीचे दारूचे उत्पादन करून त्याने मानवी शरीरास इजा किंवा दुखापत होण्याची जाणीव असुन ही त्याचे सेवन करणे कामी विक्री साठी हातभट्टीची दारू तयार करताना जागीच मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध कायदेशीर तक्रार आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल नमुद करण्यात आला आहे. यवत पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांचे मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस हवालदार कदम तपासी अंमलदार पोलीस हवालदार मोहिते पुढील तपास करीत आहेत.








