राहु येथे भोईटे कुटुंबातील तीन व्यक्ती विजेच्या धक्क्याने घायाळ दोघांचा मृत्यू; तर औषध उपचाराने एकाची प्रकृती स्थीर
प्रतिनिधी : अनिल गायकवाड
दौंड : तालुक्यातील मौजे राहू ता दौंड जिल्हा पुणे येथील भोइटे कुटुंबातील तीन व्यक्तीला विजेचा करंट लागुन बेशुद्ध अवस्थेत पडले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये १) रोहित अनिल भोइटे, वय २० वर्ष २) ओम नितीन भोइटे, वय १८ वर्ष असे आहे. तर सोनाली नितीन भोइटे वय ४० वर्ष यांचेवर राहु येथील ग्रामीण रुग्णालयात औषध उपचार करून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. या धक्कादायक घटनेची यवत पोलीस स्टेशन येथे संबंधित मयताचे नातेवाईकांची खबर घेऊन अकस्मात मयत नोंद दाखल करण्यात आली आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की आज दि १९ रोजी सकाळी ०७ वाजे सुमारास घरा शेजारी असलेल्या जनावराच्या गोठ्यात कपडे वाळत घालवण्यासाठी बांधलेल्या लोखंडी तारेला विजेचा करंट असल्याची माहिती कुटुंबातील व्यक्तींना नसावी अशी माहिती सूत्रांनी दिली.
भोइटे यांच्या जनावराच्या गोठयाच्या बाहेरच्या बाजूला कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या लोखंडी तारेला विजेचा करंट लागुन तीन इसम बेशुद्ध पडले हि घटना दि १९/०८/२०२६ रोजी सकाळी ०७ वाजे सुमारास घडली आहे. यामध्ये १) रोहित अनिल भोइटे, वय २० वर्ष २) ओम नितीन भोइटे,वय १८ वर्ष ३) सोनाली नितीन भोइटे वय ४० वर्ष असे तीन इसम बेशुध्द अवस्थेत पडल्याने त्यांना तत्काळ मौजे राहू येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता सोनाली नितीन भोइटे यांचेवर औषध उपचार करून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
परंतु इसम नामे १) रोहित अनिल भोइटे वय २० वर्षे २) ओम नितीन भोइटे वय १८ वर्षे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील अधिक औषध उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सकाळी ८:०० वाजे दरम्यान यवत ग्रामीण रुग्णालय ता.दौड येथे नेले असता त्यांना तपासुन ते उपचारापुर्वीच मयत झाले असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे. यवत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सदर घटने बाबत संबंधित मयताचे नातेवाईक यांची खबर घेऊन अकस्मात मयत दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहोत.








