जागतिक कीर्तीचे रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे स्मृतिशेष कृतज्ञतांजली सभा संपन्न
प्रतिनिधी : मिलिंद इंगळे
मुर्तिजापूर : दि. २० ऑगस्ट २०२६, जागतिक कीर्तीचे रेखाचित्रकार तथा कलाक्षेत्रात आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून अमूल्य योगदान देणारे स्मृतिशेष श्रीधर अंभोरे यांच्या कृतज्ञतांजली सभेचे आयोजन आज १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता नालंदा बुद्ध विहार, मुर्तिजापूर येथे करण्यात आले. भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सभेत उपस्थित मान्यवरांनी श्रीधर अंभोरे यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या कलात्मक कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनीता इंगळे होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी माधव काळे, संदीप वाकोडे (गझलकार), मिलिंद इंगळे (गझलकार, चित्रकार) प्रकाश उमाळे (शिल्पकार, चित्रकार), गजानन तायडे (पत्रकार), प्रफुल भाऊ भटकर (पत्रकार), दिनेश भाऊ डोंगरदिवे (पत्रकार), छत्रपती वाकोडे (शिक्षक), कोकिळा वानखडे, कैलास ढोके, छत्रपती वाकोडे (शिक्षक), लता गुजर आणि रामेश्वर धंदर(शिक्षक), नरेंद्र मेश्राम, कैलास ढोके उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी श्रीधर अंभोरे यांच्या कलाक्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या रेखाचित्रांच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेला कलाविष्कार आणि समाजमनावर उमटविलेला ठसा हा कायम स्मरणात राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पक कांबळे यांनी केले.
यावेळी साहित्यिक, कलाप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही कृतज्ञतांजली सभा आंबेडकरवादी साहित्यसंसद नागपूर – शाखा मुर्तिजापूर, दिपस्तंभ बहुउद्देशीय संस्था, गझलदीप प्रतिष्ठान, कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंडळ, विशाखा महिला मंडळ आणि कलासृष्टी मल्टिपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. श्रीधर अंभोरे कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये
कलाकृती आणि त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा सूर यावेळी उपस्थित मान्यवरांच्या मनोगतातून उमटला.
कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ कवी माधव काळे यांच्या राष्ट्रवंदनेने करण्यात आली.








